IMD Alert: पावसाबाबत महत्वाची बातमी सामोर आली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात धुवांधार बॅटींग करणारा मॉन्सून सप्टेंबर (Monsoon September) महिन्यातही आणखी सक्रिय होणार आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तण्यात आली आहे.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार
सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. (RAIN) संपूर्ण देशात या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 109 टक्के पाऊस होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले आहे.
हे ही वाचा: PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेवर कृषी मंत्री तोमर यांचं मोठं विधान...
या भागांत मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात गेल्या दोन दिवसापासून काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, बीड, उस्मानाबाद, नांदेड, सातारा, सांगली, लातूर, चंद्रपूर, अमरावती, परभणी, गडचिरोली, वर्धा आदी जिल्ह्यांत या महिन्यात अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा: आजपासून मोठे बदल..! शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांच्या जीवनावर पडणार प्रभाव.. घ्या जाऊन
हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी (ता. १) ऑनलाइन पत्रकार परिषदेत सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात राज्याच्या सर्वच भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
यातही कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे.
हे ही वाचा: झुकेगा नहीं साला..! कापसाला मिळाला 16 हजाराचा उच्चांकी भाव
मोठी बातमी! कर्मचाऱ्यांना या महिन्यात, या तारखेला महागाई भत्त्याची रक्कम मिळणार...
Share your comments