1. बातम्या

झुकेगा नहीं साला..! कापसाला मिळाला १६ हजाराचा उच्चांकी भाव

जळगाव : शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका सुरूच आहे. पण आता मात्र कुठेतरी दिलासा मिळताना दिसत आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Cotton rate

Cotton rate

जळगाव : शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका सुरूच आहे. पण आता मात्र कुठेतरी दिलासा मिळताना दिसत आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदीला (Buy cotton) सुरुवात झाली आहे.

कापसाला १६ हजाराचा उच्चांकी भाव

जिल्ह्यांतील बोदवड येथे कापसाला चक्क १६ हजार रुपये तर सातगाव डोंगरी ता.पाचोरा येथे १४७७२ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. पांढऱ्या सोन्याचे नंदनवन असलेल्या बोदवड तालुक्यात बुधवारी कापूस खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला.

त्यात खरेदीच्या शुभ मुहूर्तावर सोळा हजाराचा भाव देण्यात आल्याने कापसाची यंदाची सुरुवात जोरदार झाली. वैष्णवी ट्रेडर्सचे संचालक राजू वैष्णव यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला. त्यात १६ हजाराचा भाव मिळाला.

देशातील प्रथम शेती अवजाराचे ग्रीन सिस्टिम शोरूम बार्शीत सुरू, शेतकऱ्यांना होणार फायदा

सातगाव डोंगरी ता. पाचोरा येथील व्यापारी बाळू शंकर वाघ आणि ज्ञानेश्वर शंकर अमृतकर यांनी १४ हजार ७७२ रुपये भावाने कापूस खरेदी केला. पहिल्या दिवशी ६७ किलो कापूस खरेदी झाला. धरणगाव येथे श्री जिनिंगमध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली. मुहूर्ताचा भाव यावेळी ११ हजार १५३ रुपये प्रति क्विंटल असा मिळाला.

'एकरकमी FRP घेतल्याशिवाय राज्यातला एकही कारखाना सुरु होवू देणार नाही'

कापसाला असा मिळाला भाव (क्विंटलप्रमाणे)

बोदवड : १६००० रुपये
सातगाव डोंगरी : १४७७२ रुपये
बाळद : ११५५१ रुपये
धरणगाव : १११५३ रुपये
कासोदा : ११०११ रुपये
कजगाव : ११०००रुपये

१ सप्टेंबर पासून होणार मोठे बदल; थेट होणार खिश्यावर परिणाम...

English Summary: Cotton got the highest price of 16 thousand Published on: 01 September 2022, 10:08 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters