ऑगस्ट महिन्यात पडलेल्या जोरदार पावसाने सगळीकडे दाणादाण उडवली. राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात चांगल्यापैकी वाढ झाली. शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला. शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील अतोनात नुकसान केले आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाने उघडीप दिली होती.
यामुळे बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत असतानाच कालपासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणीदेखील बऱ्याच ठिकाणी पावसामुळे दाणादाण उडालेली बघायला मिळाली.
सध्या पावसाच्या स्थितीबाबत हवामान विभागाची माहिती
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असूनहा पाऊस विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानुसार 7 ते 11 सप्टेंबर पर्यंत हा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. जर आपण कालचा विचार केला तर या राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी कडाक्याचं ऊन होतं व दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचे आगमन झाले. बऱ्याच ठिकाणी अंधार पडून आलेलं बघायला मिळाले व त्यानंतर मुसळधार पाऊस पडला.
नक्की वाचा:Rain Alrt: राज्यातील या जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस कोसळणार! यलो अलर्ट जारी
वातावरणात अचानक झालेला हा बदल अजुन किती दिवस राहील यासंबंधी हवामान विभागाच्या तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली असून राज्यात आठ सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर आपण मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर नगर, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर
या जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून मराठवाड्यामधील हिंगोली,बीड,उस्मानाबाद,लातूर आणि नांदेड सारख्या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे.
जर आपण विदर्भाचा विचार केला तर चंद्रपुर,गडचिरोली,नागपूर,अमरावती,वाशिम, बुलढाणा, अकोला इत्यादी ठिकाणी पाऊस थैमान घालेल अशी शक्यता आहे.
Share your comments