1. हवामान

Rain Alert : ब्रेकिंग! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार! हवामान विभागाचा इशारा

Rain Alert : गुरुवारी महाराष्ट्रात पडणारा पाऊस (Monsoon News) पुन्हा एकदा लोकांच्या अडचणीत वाढ करू शकतो. हवामान केंद्र मुंबई (Weather Department Mumbai) ने गुरुवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Rain) शक्यता व्यक्त केली आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
rain alert maharashtra

rain alert maharashtra

Rain Alert : गुरुवारी महाराष्ट्रात पडणारा पाऊस (Monsoon News) पुन्हा एकदा लोकांच्या अडचणीत वाढ करू शकतो. हवामान केंद्र मुंबई (Weather Department Mumbai) ने गुरुवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Rain) शक्यता व्यक्त केली आहे.

हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथे मेघगर्जनेसह हलक्या ते मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) अंदाज आहे.

याशिवाय अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ येथे मेघगर्जनेसह हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची (Monsoon) शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने 11 सप्टेंबरपर्यंत अलर्ट जारी केला आहे. याआधी बुधवारीही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सुरूच होता. खाजगी हवामान एजन्सी स्कायमेट वेदरच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागात चक्रीवादळ आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, ज्यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो.

जाणून घेऊया गुरुवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल?

राजधानी मुंबईचे आजचे हवामान:- गुरुवारी आज मुंबईत कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि मध्यम पावसाची शक्यता आहे.

पुण्याचे आजचे हवामान:- पुण्यात कमाल तापमान 30 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.  ढगाळ वातावरण असेल आणि येथेही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज नागपूरचे हवामान:- नागपुरात कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.  ढगाळ वातावरण असेल आणि काही काळ पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. 

नाशिकचे आजचे हवामान:- नाशिकमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. अंशतः ढगाळ वातावरण असेल आणि मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद आजचे हवामान :- आज औरंगाबादमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. अंशतः ढगाळ वातावरण असेल आणि मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे.

English Summary: rain alert mumbai weather department gave alert Published on: 08 September 2022, 08:00 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters