1. हवामान

उद्यापासून पुन्हा पाऊस! उद्यापासून राज्यातील 'या'भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही महाराष्ट्रमध्ये पाऊस झाला त्यामुळे राज्यातील बरीच धरणे तुडुंब भरली. त्यामुळे शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. परंतु त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने ऐन बहरात असलेल्या पिकांना आता पाण्याची नितांत आवश्यकता होती. या सगळ्या परिस्थितीत आता एक आनंदाची बातमी पुढे आली असून काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे उद्यापासून पुन्हा राज्यात पुनरागमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
heavy rain guess in maharashtra

नक्की वाचा:Rain Alert: राज्यात पुन्हा मुसळधार कोसळणार! अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

 पावसासाठी जे काही पोषक वातावरण हवे ते  अरबी समुद्रात तयार झाल्याने आणि त्यासोबतच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे उद्यापासून पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टी तसेच विदर्भ व मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 सध्या एकंदरीत मान्सूनची परिस्थिती

 बंगालचा उपसागरामध्ये जो काही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे मान्सूनचे पश्चिम वायव्य दिशेने वाटचाल सुरू आहे.

नक्की वाचा:Organic Fertilizer: शेण इतर टाकाऊ पदार्थापासून 'या'पद्धतीने तयार करा कंपोस्ट,पीक येईल भरघोस

 यासोबतच अरबी समुद्रात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे 8 सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

आठ ते दहा सप्टेंबर दरम्यान नाशिक, पुणे आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली मध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नक्की वाचा:आता कोणी कोणाचा बांध फोडला लगेच कळणार!! ड्रोनद्वारे होणार जमिनीची मोजणी..

English Summary: meterological guess of heavy rain in some part of maharshtra from tommorow Published on: 07 September 2022, 08:38 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters