1. हवामान

अंदाज पावसाचा!या कालावधीत होणार तीनदा अतिवृष्टी, ऑगस्टमध्ये 10 ते 12 दिवस पावसाचा खंड

सध्या महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळत असून धरणाची पाणी पातळी कमालीची वाढले असून बऱ्याच अंशी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ मिटला आहे. आपल्याला माहित आहेच की, जून महिना हा पावसाने पूर्णपणे कोरडा काढल्यानंतर मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने राज्यात दमदार हजेरी लावली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
heavy rain guess in will be coming august and september

heavy rain guess in will be coming august and september

सध्या महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळत असून धरणाची पाणी पातळी कमालीची वाढले असून बऱ्याच अंशी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ मिटला आहे. आपल्याला माहित आहेच की, जून महिना हा पावसाने पूर्णपणे कोरडा काढल्यानंतर मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने राज्यात दमदार हजेरी लावली.

जवळजवळ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच सर्वदूर चांगला पाऊस होऊन शेतकरी राजाला खूप चांगला दिलासा मिळाला. या सगळ्या पावसाच्या बातम्या मध्येच अजून एक सुखावह बातमी समोर येत आहे. ती म्हणजे येणाऱ्या ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात किमान तीनदा तरी अतिवृष्टी होईल असा अंदाज आहे.

नक्की वाचा:पावसाचे सत्र सुरूच! पुढील दिवस धो धो कोसळणार; आयएमडीने दिला रेड अलर्ट

 या बाबतीत बोलताना हवामान खात्याचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यामध्ये जवळ जवळ दहा ते बारा दिवस पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे

परंतु जुलै महिन्यात ज्या प्रकारचा पाऊस झाला तसाच पाऊस 15 ऑगस्ट पर्यंत पडण्याची शक्यता आहे. तसाच जुलै सारखेच आणखी मोठे दोन ते तीन पाऊस ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पडतील.

नक्की वाचा:IMD Alert: देशभरात आज धो धो बरसणार! या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, IMD चा अलर्ट जारी

 अप्पर वर्धा धरणाचे 13 दरवाजे उघडले

 अप्पर वर्धा प्रकल्पाचे 13 दरवाजे 200 मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीला पूर येऊन आष्टी ते मोर्शी हा मार्ग बंद झाला आहे. त्यासोबतच निम्न वर्धाचे एकतीस दरवाजे शंभर सेंटिमीटरने उघडणार असल्‍याचे वर्धा नदी पात्रालगत अशा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

त्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यात देखील सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली असून गगनबावडा, राधानगरी  आणि शाहूवाडी तालुक्यामधे बऱ्या प्रमाणात सरी कोसळत आहेत. तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात देखील पावसाचा जोर वाढू लागला आहे.

नक्की वाचा:पावसाची बातमी! पुढील 4 दिवस पावसाचे; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी

English Summary: heavy rain guess in will be coming august and september Published on: 25 July 2022, 12:03 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters