1. हवामान

पावसाची बातमी! पुढील 4 दिवस पावसाचे; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी

Maharashtra Rain: यंदा राज्यात मान्सूनने वेळेवर हजेरी लावली आहे. त्यामुळे उष्णतेपासून हैराण झालेल्या नागिरकांना दिलासा मिळाला आहे. तसेच राज्यातील शेतकरी वर्ग मान्सूनच्या पावसामुळे सुखावला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच येत्या ४ दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.

Heavy Rain

Heavy Rain

Maharashtra Rain: यंदा राज्यात मान्सूनने (Monsoon) वेळेवर हजेरी लावली आहे. त्यामुळे उष्णतेपासून हैराण झालेल्या नागिरकांना दिलासा मिळाला आहे. तसेच राज्यातील शेतकरी वर्ग मान्सूनच्या पावसामुळे (Monsoon Rain) सुखावला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच येत्या ४ दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शनिवारपासून पुढील चार दिवस महाराष्ट्राच्या (Maharashtra) अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील घाट भागात काही ठिकाणी गडगडाट आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे.

राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे आणि नंदुरबारमध्ये शनिवार आणि रविवारी पाऊस सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय जळगाव, नाशिक, पुणे, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतही पाऊस अपेक्षित आहे. मात्र, कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

पिकांना येणार सोन्याचा मोहर! फक्त ही 10 खते वापरा आणि मिळवा भरघोस उत्पन्न; करा असा वापर...

तर हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते समाधानकारक' श्रेणीत नोंदवला जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमधील रविवारचे हवामान जाणून घेऊया...

पुणे हवामान

पुण्यात कमाल तापमान 28 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 62 वर नोंदवला गेला.

नागपूर हवामान

नागपुरात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असेल आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 45 आहे, जो 'चांगल्या' श्रेणीत येतो.

Organic Fertilizer: शेतकऱ्यांचे जीवन बदलणार! शेतात टाका हे खत १८ दिवसांत होईल फायदाच फायदा

मुंबई हवामान

रविवारी मुंबईत कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 47 वर नोंदवला गेला.

औरंगाबाद हवामान

औरंगाबादमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हलक्या पावसाचा अंदाज आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 87 आहे.

नाशिक हवामान

नाशिकमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडेल. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीतील 40 आहे.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात पक्षी येताच वाजते घंटा, इंजिनिअरही या जुगाडासमोर फिक्के
वाह क्या बात है! फक्त 15 हजार गुंतवले आणि 15 लाख कमावतोय हा शेतकरी; मुख्यमंत्र्यांकडूनही गौरव

English Summary: Heavy rain warning, in these districts of Maharashtra Published on: 24 July 2022, 09:57 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters