सध्या पावसाचे (rain) वातावरण जोरात असल्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस पावसाचे वातावरण कसे राहील? याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी सावध राहिले पाहिजे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
एकीकडे शेतीमध्ये पिके तर दुसरीकडे पावसाचा जोर. अशावेळी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी कशी घ्यावी, याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पीक व्यवस्थापन
१) कापूस
पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पाऊस झाल्यानंतर कापूस पिकात शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी फवारणीची कामे पुढे ढकलावीत.
कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करा.
LIC च्या नवीन पेन्शन योजने संबंधित खास 10 महत्वाच्या गोष्टी; जाणून घ्या
२) तूर
शेतकऱ्यांनो पाऊस झाल्यानंतर तूर पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बाहेर काढण्याची व्यवस्था करा. तसेच फवारणीची कामे पुढे ढकला.
तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करा.
दिवसा झोपल्याने खरंच नुकसान होते का? वाचा आयुर्वेदातील महत्वाच्या गोष्टी...
३) भुईमूग
भुईमूग पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करा. फवारणीची कामे पुढे ढकला.
भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड (Imidacloprid) 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करा.
मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेल्या जमिनीत रब्बी भुईमूग पिकाची लागवड करा. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते, यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या जमिनीत जाण्यास तसेच शेंगा वाढीस चांगली मदत होते.
महत्वाच्या बातम्या
ऑक्टोबरमध्ये 'या' राशींचे नशीब ताऱ्यांसारखे चमकणार; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
शेतकरी मित्रांनो 12 व्या हप्त्याची स्थिति घरी बसून एका कॉलवर तपासा; जाणून घ्या
शेतकऱ्यांना शेती यंत्रे खरेदी करण्यासाठी मिळणार 80 टक्यांपर्यंत अनुदान; असा घ्या लाभ
Share your comments