Maharashtra Rain Alert: राज्यात सध्या जोरदार पाऊस (Rain) सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर यंदाच्या मान्सूनमध्ये (Monsoon) 110 लोकांनाच मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून (Weather Department) वर्तवण्यात आला आहे.
राज्य आपत्ती परिस्थिती अहवाल निर्देशांकानुसार, सर्वाधिक मृत्यू नागपुरात (15) झाले आहेत, त्यानंतर नाशिक (13) आहेत. अतिवृष्टीमुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत 218 जनावरांचाही बळी गेला आहे. गेल्या 24 तासांत यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांत सरासरी 13.3 मिमी पाऊस झाला आहे. या हंगामात 28 जिल्ह्यांमध्ये सरासरी 583 मिमी पाऊस झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासांत एवढा पाऊस झाला
गेल्या 24 तासांत मुंबई शहरात 16 मिमी तर उपनगरात 7 मिमी पाऊस झाला आहे. या मोसमात मुंबई शहरात 1262 मिमी आणि उपनगरात 1493 मिमी पाऊस झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सुमारे 309 गावे पुरामुळे प्रभावित झाली असून 14,480 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, सरकारने राज्यभरात 83 मदत केंद्रे स्थापन केली आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सर्व 12 तुकड्या आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या चार तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत.
पावसाचे सत्र सुरूच! पुढील ४ दिवस धो धो कोसळणार; आयएमडीने दिला रेड अलर्ट
राज्यात पावसामुळे 8 लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे
या पावसाळ्यात वीज पडणे, दरड कोसळणे, झाडे पडणे, पूर येणे या नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यात आतापर्यंत 110 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 28 जुलैपर्यंत ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, एका अहवालानुसार, यंदाच्या मुसळधार पावसाने राज्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याअखेरपर्यंत आठ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनो सावधान! पाऊस पडल्यानंतर तूर पिकात करा हे काम; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
कृषी विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की पिकांचे नुकसान विखुरलेले आणि काही जिल्ह्यांपुरते मर्यादित असले तरी संततधार पावसाने ते वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
भावांनो नोकरीला करा रामराम! मोदी सरकार देत आहे व्यवसाय करण्याची संधी, व्हाल मालामाल
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! आठ लाख हेक्टरमधील उभी पिके उद्ध्वस्त
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात होणार बंपर वाढ, DA ही ४ टक्क्यांनी वाढणार
Share your comments