1. यशोगाथा

जिरेनियमच्या शेतीतून युवा शेतकरी कमवतोय तब्बल 12 लाख रुपये; वाचा लागवड आणि फायदे..

Geranium cultivation

Geranium cultivation

सध्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशातच एक कौतुकास्पद बातमी समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील महेश काळे या उच्च शिक्षीत तरुणाने आपल्या शेतात अनोखा प्रयोग करीत चार एकर क्षेत्रात जिरेनियमची (geranium cultivation) लागवड केली आहे.

चार एकर शेती क्षेत्रातून वर्षाला 120 किलोच्या आसपास जिरेनियमचे तेल (Geranium oil) काढले जात असून यातून या शेतकऱ्याला वर्षाला 12 लाख रुपयांचा फायदा होत आहे. या जिरेनियमच्या पिकापासून तेल काढले जात असून तेलाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी 13 ते 14 लाख रुपये खर्च करून प्लांट उभा केला आहे. एका उच्च शिक्षित तरुणाने आपल्या शेतात नवीन प्रयोग करत शेती केल्याने त्याच्या या प्रयोगाचे कौतुक होत आहे.

हे ही वाचा: एकच वनस्पती अनेक रोगांवर गुणकारी; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकीत..

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शेतकरी महेश काळे म्हणाले, “जिरेनियमची शेती उसापेक्षा फायद्याची आहे. जीरेनियमच्या शेतीला हमीभाव असल्याने ऊसाच्या बिलाप्रमाणे पैशासाठी थांबावे लागत नाही. लगेच रोख पैसे मिळतात. बाजारात या जीरेनियमच्या तेलाला जास्त प्रमाणात मागणी असून शेतकऱ्यांनी ही शेती करायला काही हरकत नाही.

ऊसाप्रमाणे या पिकाचा प्रश्न निर्माण होत नाही. जिरेनियमची रोपे मित्राच्या माध्यमातून आणली असून याच्या लागवडीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. ऊसाच्या शेतीला मेहनत घेतो, त्याप्रमाणे या पिकाला मेहनत घ्यावी लागते”.

हे ही वाचा: मोठी बातमी: सरकारकडून खाद्यतेलाचे दर कमी करण्याचे निर्देश; सर्वसामान्यांना दिलासा..

जिरेनियमच्या शेतीला ड्रीपनेच पाणी द्यावे लागते. त्यामुळे पाणी वाचून पीक चांगले येते. लागवड करत असताना 4 फुटावर बेड सोडून रोपांची सव्वा फुटावर लागण केली आहे. या पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी सध्या दीड फुटावर याची लागवड करण्याचे नियोजन सुरू आहे. जिरेनियम पिकापासून काढलेले तेल मुंबई येथील व्यापाऱ्यांना 11 हजार रुपये किलो दराने विकले जात आहे.

या जिरेनियम पिकाचे एकरी तेल 30 किलोच्या आसपास निघते. माझ्याकडे 4 एकर जिरेनियम क्षेत्र असून यातून मला वर्षाकाठी 12 लाख रुपये मिळतात. सर्व खर्च जावून 8 ते 9 लाख रुपये फायदा होतो, अशी माहिती शेतकरी महेश काळे यांनी दिली.

हे ही वाचा: नितीन गडकरींनी सांगितला मास्टर प्लॅन; सरकारच्या ‘या’ योजनेतून वाढणार सर्वसामान्यांचे उत्पन्न

English Summary: Young farmers earn Rs 12 lakh from geranium cultivation; Planting and benefits Published on: 14 July 2022, 09:29 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters