1. कृषीपीडिया

शेतकरी मित्रांनो, पेरणीपूर्वी करा फक्त 'हे' काम; लाखों रुपयांनी वाढणार उत्पन्न..

सध्या खरीप हंगामातील काही मुख्य पिकांच्या पेरणी चालू आहेत. त्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पिकांचे पाऊस व वाढत्या वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरी सध्या सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, बाजरी, मका, भुईमूग, ऊस आणि कडधान्ये पिकांची वेळेत पेरणी करता यावी यासाठी धावपळ करत आहेत.

खरीप हंगामातील  पेरणी

खरीप हंगामातील पेरणी

सध्या खरीप हंगामातील काही मुख्य पिकांच्या पेरणी चालू आहेत. त्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पिकांचे पाऊस व वाढत्या वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरी सध्या सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, बाजरी, मका, भुईमूग, ऊस आणि कडधान्ये पिकांची वेळेत पेरणी करता यावी यासाठी धावपळ करत आहेत.

शेतीतून चांगले उत्पन्न काढण्यासाठी शेतकरी चांगल्या बियाणांचा वापर, चांगल्या दर्जाची खते वापरण्यावर भर देत असतात. पिकांचे उत्पन्न पूर्णपणे बियाणांवर अवलंबून असते खरे पण शेतकऱ्यांना काही महत्वाच्या पीक पद्धती माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम बीजप्रक्रिया योग्य पद्धतीने करावी.

हे ही वाचा: Village Business Ideas: गावात व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 कल्पना; भरपूर नफा मिळणार..

बीजप्रक्रिया कशी करावी?

सर्वप्रथम शेतकऱ्यांनी बिजोपचार प्रक्रियेमध्ये बियाणे स्वच्छ करून घ्यावे आणि त्यावर रासायनिक लेप लावावा. यामुळे उगवणारे पीक कीटक आणि रोगांपासून मुक्त होते. तसेच शेतकऱ्यांना जिवाणू संवर्धनाच्या साहाय्याने देखील बीजप्रक्रिया करता येते. यामुळे पिकावरील किडी व रोगांचा धोका 50 टक्क्यांपर्यंत टाळता येतो.

हे ही वाचा: कांदा उत्पादकांसाठी अच्छे दिन, केंद्र सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

तसेच बरेच शेतकरी रोग प्रतिरोधक वाणांचे बियाणे खरेदी करतात. या बीजप्रक्रिया प्रक्रियेमुळे पिकाचे दर्जेदार उत्पादन मिळण्यास शेतकऱ्यांना चांगली मदत होते. जर बियाण्यांवर योग्य रसायनांची प्रक्रिया केली तर बियांची उगवण उत्तमरीत्या होऊन. यामुळे पिकाचा चांगला विकास होतो. म्हणून सुरुवातीपासून बीजप्रक्रियेत काळजी घेतली तर पुढे कीटकनाशके, खते आणि पीक उत्पादनावरील खर्च भरपूर प्रमाणात कमी होतो आणि वायफळ खर्च टळतो.

हे ही वाचा: IMD Alert: राज्यात पावसाचा धुमाकूळ! 'या' भागात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

English Summary: Farmer friends, do only this work before sowing; Income will increase by lakhs of rupees Published on: 13 July 2022, 12:28 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters