1. बातम्या

मोठी बातमी: सरकारकडून खाद्यतेलाचे दर कमी करण्याचे निर्देश; सर्वसामान्यांना दिलासा..

नवी दिल्ली: सध्या महागाई (Inflation) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्वसामान्य लोकांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारने तीन प्रमुख खाद्यतेल संघटनांना पत्र लिहून तत्काल दरात कपात करावी, असे निर्देश दिले आहेत.

oil prices

oil prices

नवी दिल्ली: सध्या महागाई (Inflation) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्वसामान्य लोकांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारने तीन प्रमुख खाद्यतेल संघटनांना पत्र लिहून तत्काल दरात कपात करावी, असे निर्देश दिले आहेत.

तसेच याबाबद अन्न व सार्वजनिक वितरण विभागाला नियमितपणे कळवावे अशा सूचना देखील दिल्या आहेत. सरकारने सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (Solvent Extractors Association of India), व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (Vegetable Oil Producers Association of India)आणि सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन या तीन प्रमुख संघटनांना पत्र लिहिले आहे. लिहिलेल्या पत्रात सरकारने म्हटले आहे की, “जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाली आहे.

हे ही वाचा: रेशन कार्डचा नवीन नियम आला; 'या' अपात्र शेतकऱ्यांना त्वरित करावं लागणार रेशनकार्ड सरेंडर

अशा परिस्थितीत, उद्योग संघटनांनी त्यांच्या सदस्यांशी बोलून किमान १५ रुपये प्रति लिटर कमी दराने खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून दिले पाहिजे”. असे 6 जुलै रोजी कंपन्यांना आठवडाभरात किमती कमी करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. मात्र सरकारने पाठविलेल्या पत्राला 6 दिवस झाले असूनही अनेक कंपन्यांनी खाद्यतेलाचे दर कमी केलेले नाहीत.

लिबर्टी (Liberty), पार्क ऍग्रो (Park Agro) आणि मदर डेअरीनेच (Mother Dairy) या कंपन्यांनीच फक्त आतापर्यंत किमती कमी केल्या आहेत. खाद्यतेलाच्या आयातीवर जास्त अवलंबून राहिले तर दीर्घकाळ भारताच्या राष्ट्रीय हिताशी तडजोड होऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

हे ही वाचा: नितीन गडकरींनी सांगितला मास्टर प्लॅन; सरकारच्या ‘या’ योजनेतून वाढणार सर्वसामान्यांचे उत्पन्न

तसेच रेटिंग आणि रिसर्च फर्म केअरएजने एका अहवालात म्हटले आहे की, “भारतासाठी आता केवळ आत्मविश्वासपूर्ण उपक्रमांद्वारे स्वावलंबी बनणे आवश्यक नाही तर सर्वोत्कृष्ट बनून पुढे जाणे आवश्यक आहे. स्वावलंबन म्हणजे आर्थिकदृष्ट्या विवेकी असणे तसेच धोरणात्मकदृष्ट्या जाणकार असणे.”

हे ही वाचा: शेतकरी मित्रांनो, पेरणीपूर्वी करा फक्त 'हे' काम; लाखों रुपयांनी वाढणार उत्पन्न..

मात्र रशिया- युक्रेन संकटामुळे प्रमुख खाद्यतेल निर्यातदार देशांनी पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. अशा स्थितीत आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवले पाहिजे. गेल्या काही वर्षांत त्यात वाढ होत आहे. तरीही त्याचे जेवढे सेवन केले जाते तेवढे उत्पादन होत नसल्याचेही अहवालात म्हंटले आहे.

हे ही वाचा: कामठी सोसायटीच्या चेअरमन पदी गणेश आरडे यांची निवड
रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने केली मोठी घोषणा; लाभार्थ्यांना होणार फायदाच फायदा..

English Summary: Big news: Government directs to reduce edible oil prices Published on: 13 July 2022, 04:56 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters