1. यशोगाथा

Three Idiots: हातातल्या लाखो पगाराच्या सोडल्या नोकऱ्या, स्थापन केली कंपनी आणि बनवत आहे शेतकऱ्यांना श्रीमंत

भारतीय अर्थव्यवस्था तसेच ग्रामीण भारत आणि शेतकऱ्यांचा शेतीक्षेत्र हा कणा आहे. या पार्श्वभूमीवर शेतीचा विकास कासवाच्या गतीप्रमाणे सुरू आहे. त्याचा खुप गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. कारण देशातील दोन तृतीयांश लोक उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत. यासाठी कृषी उत्पादकता वाढवणे गरजेचे असून यांत्रिकीकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या पार्श्वभूमीवर या लेखात आपण सर्व इन वन प्लॅटफॉर्म बद्दल माहिती घेऊ जे तीन मित्रांनी मिळून सुरू केले आहे आणि आज लाखो शेतकऱ्यांना मदत करत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
three youth establish one in platform for solving problem of farmer

three youth establish one in platform for solving problem of farmer

भारतीय अर्थव्यवस्था तसेच ग्रामीण भारत आणि शेतकऱ्यांचा शेतीक्षेत्र हा कणा आहे. या पार्श्वभूमीवर शेतीचा विकास कासवाच्या गतीप्रमाणे सुरू आहे. त्याचा खुप गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. कारण देशातील दोन तृतीयांश लोक उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत. यासाठी कृषी उत्पादकता वाढवणे गरजेचे असून यांत्रिकीकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या पार्श्वभूमीवर या लेखात आपण सर्व इन वन प्लॅटफॉर्म बद्दल माहिती घेऊ जे तीन मित्रांनी मिळून सुरू केले आहे आणि आज लाखो शेतकऱ्यांना मदत करत आहे.

शेती मधल्या समस्या

सध्या कृषी पद्धती आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या टिकाऊ नाहीत, ज्यामुळे भारतातील पिकांचे उत्पादन कमी आहे. खराब देखबाल, सिंचन व्यवस्था आणि सार्वत्रिक सेवांचा अभाव हे त्यामागचे कारण आहे. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी पारंपारिक, अविकसित बाजार पायाभूत सुविधा आणि अत्याधिक नियमनातून जावे लागते व त्याचा फटका नंतरच्या काळात शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.

नक्की वाचा:Farmer Policy:असेच शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार राहिले तर शेतकरीराजा नाही राहणार आर्थिकदृष्ट्या मागे,वाचा सविस्तर

ॲग्रीक्स ॲग्रोटेक सोडवेल शेतकऱ्यांच्या समस्या

 आयआयटी दिल्ली मध्ये पीएचडी केल्यानंतर डॉ. निलय पांडे ( सीईओ ), त्यांचे सहकारी सौरव सिंग( सीओओ) आणि विवेक कुमार( सहसंस्थापक ) यांनी एक प्लॅटफॉर्म तयार करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर त्यांनी एकत्रित पणे 2020मध्ये एग्रीक्स ॲग्रोटेक  ची स्थापना केली ज्या ठिकाणी शेतकरी त्यांच्या प्रत्येक समस्येवर उपाय शोधू शकतात आणि ते सोडवू शकतात.

 अल्पभूधारक अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळेल सेवा

 ॲग्रीक्स त्यांच्या कृषी क्लस्टर अंतर्गत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना करण्यायोग्य शेती यांत्रिकीकरण, दर्जेदार कृषी निविष्ठा, डिजिटल मॅपिंग आणि देखरेख तसेच कार्यक्षम बाजारपेठ जोडणी प्रदान करते. ऍग्रिक्सच्या कृषी सेवा किफायतशीर, विश्वासदायक, पारदर्शक आणि सुलभ आहेत.

नक्की वाचा:Top 5 Rotavator: 'या' पाच प्रकारचे रोटावेटर ठरतील शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी वरदान, जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्ये आणि किंमत

 उत्तम रोजगाराच्या संधी

 कृषी सेवा सोबत ॲग्रीक्स ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे. स्टबल व्यवस्थापन यासारख्या विविध उपक्रमाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण देखील करत असून या कंपनीचे टीम आता देशातील प्रत्येक शेतकऱ्याचे सेवा करण्यावर भर देत आहे.

 शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत

 ऍग्रिक्स सध्या नवाडा जिल्ह्यातील केशुरी,डुमराम, बल्लारी, बरीसालीगंज, पाकीव्रमा यासह 20 पेक्षा अधिक गावांमध्ये सेवा देत आहे.

नवादा बरोबरच मी कंपनी बेगूसराय, लखीसराय,दरभंगा, पाटणा आणि नालंदा जिल्ह्यात देखील कार्यरत असून लवकरच तिच्या विविध भागांचा विस्तार करण्याची योजना आहे.

 या कंपनीचे अधिकृत वेबसाईट

https://www.agrixagro.com/ ला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता.

नक्की वाचा:Tractor For Farmer: 'farmtrac atom 26' मिनी ट्रॅक्टर करेल कमी वेळेत शेती आणि फळबागाची कामे, जाणून घ्या किंमत

English Summary: three youth establish one in platform for solving problem of farmer Published on: 27 July 2022, 01:26 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters