उच्च शिक्षण आणि शेती जवळजवळ तरूणांमध्ये विरुद्ध टोकाची बाजू असलेले दोन क्षेत्रे आहेत. आजकालच्या तरुणांमध्ये उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवून एकदम नो झंजट आयुष्य जगण्याकडे कल वाढलेला आहे.
मुळातच चांगल्या पगाराची नोकरी आणि आयुष्यात सेटलमेंट या गोष्टींसाठी उच्च शिक्षण घेतले जाते. त्यामुळे हेच तत्व अंगी बाळगून शिक्षण घेतल्यानंतर शेती किंवा शेती संबंधित व्यवसायात उतरणे तरुणांच्या पचनी पडणारे नाही.
परंतु अशा वातावरणामध्ये असेही काही तरुण आहेत जे शिक्षण आणि निवडलेले क्षेत्र यांचा काडीमात्र संबंध नसताना अशा क्षेत्रांमध्ये उडी घेतात व योग्य अभ्यास, माहितीपूर्ण व्यवसायाची सुरुवात, कष्ट आणि जिद्दइत्यादी गुणांच्या जोरावर अशा व्यवसायांमध्ये खूप यशस्वी देखील होतात. अशीच एक प्रेरणादायक कहानी आपण या लेखामध्ये वाचणार आहोत.
बहुराष्ट्रीय कंपनी मधील नोकरी सोडून शेळीपालनात यशस्वी वाटचाल
तुषार नेमाडे हा तरुण बुरानपुर जिल्ह्यातील( मध्य प्रदेश) रहिवासी असून त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केली असून एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये डिझाईनिंग इंजिनीअर या पदावर काम करत होते. परंतु म्हणतात ना मनामध्ये काही वेगळं करायची इच्छा व उर्मी असली की आवड असलेल्या क्षेत्राबद्दल कायम काहीतरी करण्याची इच्छा असते.
पुढे करत असलेल्या कामामध्ये हवे तेवढे मन लागत नाही. असेच काही तरी तुषार यांच्या बाबतीत घडले. नोकरी न करता त्याने स्वतःचा व्यवसाय करायचा होता त्यामुळे त्यांनी एका ओळखीच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून शेळीपालना विषयी पूर्ण माहिती घेतली.
या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला व त्यामध्ये क्रांती घडवून आणली. याबाबत तुषार सांगतो की, सुरुवातीला अगदी हा व्यवसाय मी 27 एकरात सुरू केला. यामध्ये शेळ्यांना राहण्यासाठी सुसज्ज शेड बांधले. तसेच बाकीच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून माहिती आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन वेटरनरी मध्ये डिप्लोमा केला आणि पूर्ण प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरू केला.
प्रशिक्षण घेतल्यानंतर सहा महिन्यांसाठी एक छोटासा प्रयोग तत्त्वावर हा व्यवसाय सुरू केला व प्रयोग यशस्वी झाल्यानंतर एक हजार ते बाराशे क्षमतेचे एक शेळी पालन केंद्र उभारले. आज ते या व्यवसायामध्ये लाखो रुपये कमवत तर आहेच परंतु इतर काही लोकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देखील देत आहेत. शेळीपालनातील योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे एका वर्षात 120 शेळ्या ते विक्रीसाठी उपलब्ध करतात. 25 किलो शेळीचे वजन झाले की ती दहा ते बारा हजार रुपयांना विकली जाते अशा प्रकारे शंभर शेळ्या विकल्या तरी दहा ते बारा लाखांचे उत्पन्न मिळते.
यावरील इतर खर्च अडीच लाख रुपये सोडला तर खर्च वजा जाता निव्वळ नफा हा सात ते आठ लाखांपर्यंत मिळतो. त्यांच्या व्यवसायाचे एक गमक म्हणजे मार्केटिंगची व्यवस्थित काळजी आणि शेळ्या बाजारातून आणताना आणि विकतांना योग्य वेळ याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असल्याचे ते म्हणतात.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:Lemon Fertilizer Management:'या' खतांचा वापर केला तर येईल लिंबूचे भर
Share your comments