1. पशुसंवर्धन

शेळीपालन करायचं ? मग हा लेख आहे तुमच्या फायद्याचा , शेळीपालनाची सर्व माहिती

शेळीचे आहेत अनेक उपयोग

शेळीचे आहेत अनेक उपयोग

कमी पैसा आणि कमी जागेत व्यवस्थित उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन. शेळीपालनाला खर्च हा फार कमी लागत असतो, आणि मोठा नफा यातून मिळत असतो. पण हा व्यवसायासा व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक असते.काही ठराविक जातीच्या शेळ्या दर दिवशी सरासरी दोन ते अडीच लिटर दूध देतात त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे.

कमी पैसा आणि कमी जागेत व्यवस्थित उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन. शेळीपालनाला खर्च हा फार कमी लागत असतो, आणि मोठा नफा यातून मिळत असतो. पण हा व्यवसायासा व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक असते.काही ठराविक जातीच्या शेळ्या दर दिवशी सरासरी दोन ते अडीच लिटर दूध देतात त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे.अलिकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्त्व येत असून तो एक स्वंतत्र व्यवसाय झाला आहे. हा व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायास आर्थिक सहाय्य देत आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायात पडू पाहत आहेत.


काय आहेत शेळीपालनाचे फायदे

१. अल्प गंतवणूकीने हा व्यवसाय केला जाऊ शकतो.
२. शेळ्या ह्या शेतकर्‍यांसाठी ‘बचत बँकेचे’ कार्य करीत असतात. आवश्यता पडल्यास त्वरित काहीशेळ्या विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.
३. शेतकऱ्यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीच्या दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक मोठ्या प्रमाणावर आढळतात.
४. शेळ्या काटक असून विपरीत हवामानशी जुळवून घेतात.
५. शेळ्या निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.
६. शेळ्याचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.
७. शेळ्यांना जागा कमी लागते यामुळे निवाऱ्या करिता खर्च कमी होतो.
८. काही जातीच्या शेळ्यापासून लोकर (मोहेर) मिळते.
९ .शेळ्यांचे खत उत्तम असते.
१०. आपल्या देशांत गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.
११. शेळ्यांच्या शिंगा पासून व खुरापासून डिंकयुक्त पदार्थ बनवितात.
१२. शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा. लसयसिन, मिथिओनीन व ट्रिप्टोफॅन शेळीच्या मांसात अधिक असते.
१३. शेळी-पालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केला जावू शकतो.

हेही वाचा : शेळीपालन व मेंढीपालनवर असलेल्या  अनुदान योजना 


भारतीय अर्थव्यवस्थेत शेळ्यांचे महत्त्व :


जगात एकंदर ६२० दशलक्ष शेळ्या असून त्यापैकी १२३ दशलक्ष शेळ्या भारतात आहे. शेळ्यांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे. देशात शेळीच्या एकंदर उत्पदनापैकी ३ टक्के दूध, ४५ ते ५० टक्के मांसची मागणी आहे.
खरं तर शेळीचा विकास दूध उत्पादनाकरिता झालाच नाही. आपल्या कडील निवडक जातींच्या शेळ्या एका वेळात २०० ते २५० लिटर दूध देतात. तर विदेशी जातींच्या शेळ्या १२०० ते१७०० लिटर दूध देतात. आपल्या देशात शेळ्यापासून वर्षाकाठी २.२ दशलक्ष टन मांस मिळते. तर पश्चिमात्य जातीच्या शेळीपासून लोकर ही मिळते.

शेळ्यांच्या जाती :


भारतात शेळ्यांच्या प्रमुख २५ जाती आढळतात. आपल्याकडील जमनापारी, बिंटल, सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दूध उत्पादनाकरिता तर बिंटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा ‘मांस’ उत्पादनाकरिता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते. साधारपणे एका वर्षात सरासरी वजन २० किलो होते. याउलट विदेशी जातींच्या शेळ्या वजनदार असून नराचे सरासरी वजन १०० ते१२५ तर मादीचे वजन ९० ते १०० कि. असते.

आपल्याकडे उस्मानाबादी संगमनेरी शेळ्या उपलब्ध असून त्या शुद्ध जातीच्या आहेत. बंदिस्त शेळी-पालन करून शेळ्याचे संगोपन केल्यास त्यांची वाढ झपाट्याने होते. बंदिस्त शेळीपालनात प्रति शेळी १००ग्रॅम खुराक व दिड ते २ किलो हिरवा चारा द्यावा त्यात चिंच, बाभूळ, बोर, पिंपळ, जांभळ, निंब इत्यादी झाडांची पाने समाविष्ट करावीत. २० ते २५ शेळ्यांमागे १ नर असावा गाभण, दूभत्या शेळ्यांना स्वतंत्र जागेत ठेवावे. जंतनाशकांचा वापर करून जंतापासून त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : कमी  वेळात मालामाल बनवणारी शेळी; जाणून घ्या 'या' जातीविषयी

कसे केले जाते शेळीपालन


१. परंपरागत पद्धत,
२. अर्धबंदिस्त पद्धत
३. बंदिस्त पद्धत.

१. परंपरागत पद्धत


परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. त्यांच्यामागे एखादा गुराखी असतो आणि तो दिवसभर त्यांना लोकांच्या बांधांना, कुपाट्यांना आणि कुरणांमध्ये चारून संध्याकाळी घरी आणतो. मग दुसर्‍या दिवशी सकाळी चरायला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घालण्याची गरज पडत नाही. अशाच पद्धतीने आपल्या राज्यात शेळ्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जात आहेत. परंतु या पद्धतीत काही ङ्गायदे आहेत आणि काही दोषही आहेत. ङ्गायदा असा की, या पद्धतीत चारा-पाण्यावर काही खर्च होत नाही.त्यामुळे नफ्या-तोट्याचा काही प्रश्‍नच नसतो. मात्र या पद्धतीने ङ्गार मोठ्या प्रमाणावर शेळ्या पाळता येत नाहीत. एखाद्या सुशिक्षित शेतकर्‍याला शेळी पालनाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर करून तीन-चारशे शेळ्या पाळायच्या असतील तर त्याला ही मोकाट पद्धत काही उपयोगाची नाही.

बंदिस्त शेळीपालन

ही पद्धत आता पुढे आली आहे. जसे आपण कोंबड्या पाळतो आणि त्यांना एका पिंजर्‍यामध्ये कायम कोंडून ठेवून तिथे त्यांना चारा-पाणी देतो. तशाच पद्धतीने काही विशिष्ट प्रकारचा गोठा तयार करून त्यात शेळ्या कायमच्या ठाणबंद ठेवल्या जातात. त्याला बंदिस्त किंवा बंदगोठा शेळीपालन असे म्हटले जाते.
त्याशिवाय ज्या शेतकर्‍यांना पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन शक्य नाही आणि पूर्णपणे मोकाट शेळीपालनही शक्य नाही अशा शेतकर्‍यांना अर्धबंदिस्त शेळीपालन उपयुक्त ठरते. त्यामध्ये थोडा वेळ शेळ्या ठाणबंद केल्या जातात आणि थोडा वेळ चरायला सोडल्या जातात. या पद्धतीला अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणतात. मोकाट किंवा अर्धबंदिस्त शेळी पालनासाठी कुरणांची गरज असते. परंतु सध्या कुरणे कमी होत चालली आहेत. त्यामुळे पुढच्या काळात बंदगोठा शेळीपालन हा प्रकारच अधिक व्यवहार्य ठरणार आहे.

मोकाट शेळी पालनामध्ये आंतरप्रजनन होत असते. त्यामुळे शेळीचा दर्जा घसरतो. पण बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण प्रजनानवर नियंत्रण ठेवू शकतो. बंदिस्त पालनात शेळ्यांच्या चार्‍यावर आणि आहारावर खर्च होतो ही गोष्ट खरी आहे. परंतु आपण व्यवस्थित चारा आणि आहार देत असल्यामुळे या पद्धतीतील शेळ्यांचे वजन भराभर वाढत जाते. जी गोष्ट मोकाट शेळी पालनात शक्य नाही.

बंदिस्त शेळी पालनाचा आणखी एक फायदा म्हणजे आपण या पद्धतीत शेळ्यांच्या रोगराईवर नियंत्रण आणि लक्ष ठेवू शकतो. बंदिस्त शेळीपालन करणार्‍यांनी आपल्या पारंपरिक पद्धतीनेच गोठा तयार करावा. या गोठ्यामध्ये दोन भाग करावेत. निम्म्या भागावर छप्पर असावे तर निम्मा भाग छपराविना परंतु आजूबाजूने कुंपण असलेले असावे. म्हणजे काही काळ शेळ्या छपराच्या गोठ्यात राहतील आणि काही काळ मोकळ्या हवेला छप्पर नसलेल्या गोठ्यात येतील.

कोंबड्याप्रमाणे त्यांना चोवीस तासात छपराच्या गोठ्यात बांधण्याची गरज नाही. गोठा थोडा उंचावर बांधावा. त्यात हवा खेळावी यासाठी आजूबाजूला जाळी असावी. तसेच पावसाचे पाणी गोठ्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. सिमेंट पाईपचे दोन अर्ध गोलाकार तुकडे करून त्यांच्या गव्हाणी बनवाव्यात. त्या गव्हाणीमध्ये चारा आणि खुराक टाकता यावा. अशाच पाईपाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठीही करता येईल. हा गोठा बांधताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, गोठा बांधण्यासाठी ङ्गार खर्च करू नये. क्रॉंक्रिटच्या भिंती, सिमेंटचे पत्रे यांची काहीही आवश्यकता नाही.

शेळीचे काय आहेत इतर फायदे?


शेळी हा असा एक प्राणी आहे की, ज्या प्राण्याचे पूर्ण शरीरच उपयोगाचे असते. आपण फक्त मटणाचा विचार करतो. पण शेळीची कातडी, शिंग, खूड, हाडे आणि केस यांचे किती उपयोग होतात याचा आपण कधी विचारच करत नाही. हा प्रत्येक अवयव उपयोगाचा असतो. शेळीच्या कातडीचा उपयोग तर कसा होतो असतो हे आपल्याला माहीतच आहे.पर्स, बॅगा तयार करण्यासाठी ही कातडी वापरली जाते. त्यानंतर हाडे. बर्‍याच जणांना हाडांचा एक उपयोग माहीत आहे, तो म्हणजे खत म्हणून. कोणत्याही जनावरांच्या हाडांची भुकटी शेतामध्ये खत म्हणून उपयुक्त असते. परंतु शेळीच्या हाडांची पावडर टूथ पेस्टमध्ये मिसळली जाते. म्हणजे आपण ज्या टुथपेस्टने दात घासतो तिच्यात शेळीच्या हाडांची पावडर मिसळलेली असते.

हाडांमध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे टुथपेस्टमध्ये ती मिसळली की, त्या टुथपेस्टमुळे दात मजबूत होतात, हा त्यामागचा विचार असतो. बरेच शाकाहारी लोक शाकाहाराची कडक पथ्ये पाळत असतात. त्यातल्या ज्या लोकांना टुथपेस्टमध्ये हाडे असतात हे माहीत असते ते लोक टुथपेस्टने दात घासत नाहीत ते यामुळेच. शेळीच्या शिंगापासून हस्तकलेद्वारा काही आकर्षक शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. अशा वस्तू परदेशात पाठविल्या तर त्यांना चांगली किंमत येते.
आपण एखादी शेळी किंवा बोकड दोन किंवा तीन हजाराला विकून टाकतो, परंतु शिंगांचा योग्य वापर करणारा मासूण नुसत्या शिंगापासून दोन हजार रुपये कमवू शकतो. तशीच अवस्था खुरांची सुद्धा असते. शेळीच्या आणि बोकडांच्या खुरापासून शर्टाच्या गुंड्या (बटन) बनवल्या जातात.

मेंढ्यांच्या केसापासून लोकर तयार होते हे तर सर्वांना माहीतच आहे. परंतु शेळीचे केस सुद्धा उपयुक्त असतात. या केसापासून पश्मिना नावाचा कपडा तयार होतो. हा कपडा महाग असतो. विशेषत: कोटांच्या आतल्या बाजूला अस्तर म्हणून पश्मिना कापड वापरले जाते.पश्मिना कापडाच्या शाली आणि गरम कपडे ङ्गार महाग असतात. पश्मिनाचे एखादे स्वेटर साधारणत: हजार रुपयांना विकले जाते. शेळीच्या केसापासून हा कपडा तयार करण्याचे कसब काश्मीर आणि तिबेटमधल्या काही विशिष्ट कलाकारांनाच अवगत आहे. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी आपल्या शेळ्या निव्वळ विकून न टाकता सामूहिकरित्या कत्तलखाने उभे केले तर शेळीचे केस, खूर, शिंग, हाडे आणि चामडी या सर्वांचे पैसे शेतकर्‍यांच्याच पदरात पडू शकतील. म्हणून शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन आपले स्वत:चेच कत्तलखाने उभे करणे ङ्गायद्याचे ठरणार आहे.


महाराष्ट्रामध्ये किती संधी आहे ?


महाराष्ट्रामध्ये शेळी पालनाच्या व्यवसायाला चांगला वाव आहे आणि शेतकर्‍यांची या व्यवसायामुळे आर्थिक अरिष्टातून सुटका होऊ शकते हेही लक्षात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन सुद्धा या व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अशा उद्योगांचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था शेळी पालनाचे प्रशिक्षण देणारे वर्ग आयोजित करीत आहेत.
ज्या शेतकर्‍यांना बंदगोठा शेळी पालन करण्यामध्ये रूची असेल आणि या व्यवसायात काही करण्याची इच्छा असेल त्या शेतकर्‍यांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा. या दोन संस्थांच्या मार्फत भरवल्या जाणार्‍या १२ दिवसांच्या शेळीपालन वर्गात सहभागी व्हावे. त्यातून शेळी पालनाविषयीच्या सर्व अंगोपांगांची माहिती त्रोटक स्वरुपात का होईना पण मिळू शकते.

 

शेळीपालनाचे कुठे मिळते प्रशिक्षण


महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रावर मेंढी आणि शेळी पालन व्यवसाय व्यवस्थाापनाचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण तीन दिवसाचे असते.
गोखलेनगर, पुणे येथील मुख्यालयाच्या ठिकाणी शेळी-मेंढी पालनाचे प्रशिक्षण दिले जाते. यांत्रिक लोकर कातरणी महामंडळामार्फत विजेवर चालणाऱ्या यंत्राद्वारे मेंढ्याची लोकर कातरणी करुन दिली जाते.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters