1. शिक्षण

देशात किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी लोन घेण्याचा विचार करत आहात का? 'ही'कागदपत्रे असतात आवश्यक

बऱ्याच विद्यार्थ्यांचे आर्थिक परिस्थिती मुळे शैक्षणिक नुकसान होते. उच्च शिक्षण घेण्याची जबरदस्त इच्छाशक्ती मुलांमध्ये असते परंतु अशा कॉलेजची फी भरण्यासाठी पालकांकडे पुरेसे पैसे नसतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
f you will take education loan from bank so this document required for that

f you will take education loan from bank so this document required for that

बऱ्याच विद्यार्थ्यांचे आर्थिक परिस्थिती मुळे  शैक्षणिक नुकसान होते. उच्च शिक्षण घेण्याची जबरदस्त इच्छाशक्ती मुलांमध्ये असते परंतु अशा कॉलेजची फी भरण्यासाठी पालकांकडे पुरेसे पैसे नसतात.

तेव्हा एकमेव पर्याय उरतो तो म्हणजे शैक्षणिक कर्ज घेणे हा होय. कारण शैक्षणिक कर्ज हा पर्याय होतकरू विद्यार्थ्यांसाठी खूपच लाभदायक सिद्ध होतो. परंतु कुठलेही बँकेकडून लोन घ्यायचे असेल तर कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यामुळे आवश्यक योग्य कागदपत्रे आपल्याकडे असणे खूपच गरजेचे असते. त्यासाठी या लेखामध्ये शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची माहिती घेणार आहोत.

 शैक्षणिक कर्ज कोणाला मिळू शकते?

 शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतात ते म्हणजे…..

1- जर तुम्हाला कुठल्याही बँकेत ना शैक्षणिक कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी ची सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

2- तुमचे वय 16 ते 35 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे.

3- यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निकष म्हणजे तुम्हाला ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्या अभ्यासक्रमाची एन्ट्रन्स टेस्ट च्या माध्यमातून तुम्हाला प्रवेश मिळणं महत्त्वाचा आहे.

 शैक्षणिक कर्ज घ्यायचे तर मग मिळते किती?

 शैक्षणिक कर्ज मर्यादाही अभ्यासक्रमांच्या नुसार अवलंबून असते. जर तुम्हाला भारतातच उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर 10 ते 15 लाख रुपये कर्ज मिळू शकते आणि तुम्हाला जर विदेशात उच्च शिक्षणासाठी जायचे असेल तर वीस लाखापर्यंत लोन सहज मिळते.

 शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1- तुम्हाला ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्या अभ्यासक्रमाचे प्रवेश पत्र आणि महाविद्यालयाचे संपूर्ण माहिती आवश्यक आहे.

2- तसेच तुम्ही प्रवेश घेत असलेल्या अभ्यासक्रमाच्या शुल्काबाबत सविस्तर माहिती असणारे कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

3- तसेच तुमचे आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि त्या संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे देखील  तेवढेच गरजेचे आहे.

4- तुम्ही शैक्षणिक कर्ज घेत असलेल्या बँकेत तुमचे अकाउंट नसेल तर तुम्हाला त्यासोबत ॲड्रेस प्रूफ द्यावे लागेल.

5- तसेच पालकांचा उत्पन्नाचा पुरावा, पालक जर नोकरी ला असतील तर त्यांच्या दोन महिन्याची सॅलरी स्लिप आणि एखाद्या व्यवसायात असतील तर  त्यांचे सहा महिन्याच्या बँक स्टेटमेंट आवश्यक असते.

6- दोन पासपोर्ट साईज फोटो

7- जर तुम्हाला शिक्षणासाठी परदेशात जायचे असेल तर तुमच्या जवळ पासपोर्ट आणि व्हिसा ची एक एक कॉपी असणे गरजेचे आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:शेतकरी आहात सर्व माहिती असणे गरजेचे! काळी मिरी लागवडिविषयी माहिती

नक्की वाचा:डॉ.पं.दे.कृ.वि, अकोला येथे कृषी व्यवयास स्टार्टअप ला प्रोत्साहन देण्यासाठी ॲग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर कार्यक्रम संपन्न

नक्की वाचा:कृषी क्षेत्रातील तरुण उद्योजकांसाठी बातमी! कोल्ड स्टोरेज साठी सरकारकडून मिळतेय अनुदान, वाचा आणि घ्या माहिती

English Summary: if you will take education loan from bank so this document required for that Published on: 27 April 2022, 09:49 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters