1. यशोगाथा

नाथाभाऊंनी करून दाखवले!! 50 एकरात खजुराचे दमदार उत्पादन..

एकनाथ खडसे यांनी शेतात एक वेगळा प्रयोग करून तो यशस्वी करून दाखवला आहे. त्यांनी तब्बल 50 एकरात (Date palm farming) खरबुजाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. एकनाथ खडसे यांनी (Muktainagar) मुक्ताईनगच्या शिवारात हा शेती क्षेत्रातील प्रयोग केला आहे.

Nathabhau farming in muktainagar

Nathabhau farming in muktainagar

राज्यात अनेक राजकारणी आहेत, की जे शेतीवर प्रेम करतात, त्यांना शेतीची आवड आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शेतात एक वेगळा प्रयोग करून तो यशस्वी करून दाखवला आहे. त्यांनी तब्बल 50 एकरात (Date palm farming) खरबुजाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. एकनाथ खडसे यांनी (Muktainagar) मुक्ताईनगच्या शिवारात हा शेती क्षेत्रातील प्रयोग केला आहे.

याबाबत एकनाथ खडसे यांनी आखाती देशातून खजुराच्या रोपाची आयात केली होती. त्यांनी लागवड पध्दतीपासून ते बाजारपेठेपर्यंतची माहिती ही त्यांनी युट्यूबवर घेतली. यावर माहिती घेत त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यानंतर आता 4 वर्ष जोपासणा केल्यानंतर खजुराचे फळ लागले आहे. यामुळे अनेकजण त्यांची ही शेती बघण्यासाठी येत आहेत.

एकनाथ खडसे म्हणाले, योग्य निघराणी, व्यवस्थापन याचेच हे फळ आहे. या शेतीचा प्रयोग हे मोजकेच शेतकरीच करतात. कारण ही शेती पध्दत खर्चिक तर आहेच पण याबाबत अधिकची माहितीही कुणाला नाही. खजुराचे रोप हे आखाती देशातून आयात करावे लागते. याचे एक रोप हे 4 हजार 500 रुपयांना असल्याने ते सर्वसामान्यांना परवडणार नाही. यामुळे याला अनुदान देण्याची मागणी देखील खडसे यांनी सरकारकडे केली आहे. यामुळे याची शेती अनेकांना करता येईल.

7th pay commission: मोठी बातमी! 5 दिवसांत हे काम करा अन्यथा पेन्शन रखडणार, सरकारचा इशारा..

त्यांनी या शेतीचा समावेश फळबाग योजनेत करावा अशी मागणीही केली. कमी पाण्यात अधिकचे पीक यासाठी ही शेती पध्दत महत्वाची आहे. खजुराची शेती ही महागडी असली तरी त्यामधून उत्पन्नही तसेच मिळते. यामुळे भविष्यात याची शेती वाढेल आणि उत्पादन मोठे होईल अशी आशा आहे.

महत्वाच्या बातम्या;
'त्या' लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द!! सरकारकडून मोठी घोषणा, वाचा नवीन नियम
लिलावाविना फळे बाजार समितीमध्येच पडून, खरेदीला गेलं की ५० ला एक, कसा घालायचा मेळ
कारखाना आणि उसाच्या शेतातील अंतराने घेतला शेतकऱ्याचा बळी, अंतर होते फक्त २५ किलोमीटर, कारखान्यावर कारवाई करा

English Summary: Nathabhau did it !! Powerful production of dates in 50 acres. Published on: 22 May 2022, 10:41 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters