फायदेशीर खजूर शेती

14 October 2018 04:06 PM


खारीक (खजूर) उष्णता सहन करणारे फळझाड म्हणून ओळखले जाते. फक्त पक्वतेच्या वेळी आणि पिकण्याच्या वेळी पाऊस तसेच आर्द्रता विरहीत वातावरणाची गरज असते. जाती परत्वे खाजुरासाठी 25-30 अंश. से. तापमानाची आवश्यकता असते, परंतु खजूर पिक 50 अंश सें मध्ये देखील तग धरून राहते. खजूर पिकासाठी रेती-पोयटा मिश्रित, पाण्याची धारणक्षमता असलेल्या तसेच अधिक सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीची आवश्यकता असते. विशेष म्हणजे क्षारयुक्त जमिनीस हे पिक प्रतिकारक्षम असून 8.5 सामु असलेल्या जमिनीत देखील हे पिक यशस्वीरीत्या घेतले जाते

खजूर लागवड

खजूर लागवड करण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात किंवा मार्च-मे महिन्यात 1x1x1 मी. लांब रुंद व खोल खड्ड्यामध्ये वरच्या थरातील माती, रेती व सेंद्रिय पदार्थ 3:1:1 प्रमाणात टाकून साधारणता: 7x7 मी. अंतरावर खजूर (झाडाची) रोपांची लागवड करावी.

खजूर लागवड करण्यासाठी रोपांची निवड

खजूर रोपांची (निर्मिती) अभिवृद्धी बियांपासून तसेच शाखीय पद्धतीने (सकर्स) पासून करता येते. खजूर पिक हे द्विलिंगी पिक आहे म्हणजे बियांपासून अभिवृद्धी केल्यास 50% रोपे मादी वृक्षाचे व 50% रोपे नरवृक्षाचे तयार होतात. अशा रोपांपासून लागवड केल्यास 5-6 वर्षांनी फळधारणा होण्यास सुरुवात होते, तसेच 50% झाडे नरांचे असल्यामुळे उत्पादन देत नसल्यामुळे उपटून टाकावी लागतात हि संभाव्य अडचण टाळण्यासाठी बियांपासून अभिवृद्धी न करता, सकर्स पासून लागवड करतात. साधारणता: 10-30 सें.मी. व्यास असलेले व 15-30 किलो. वजन असलेले सकर्स लागवडीसाठी वापरल्यास 80-90 % यशस्वी होण्याचे प्रमाण असते.

उतीसंवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपांचे फायदे 

उतीसंवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे अनुवांशिकदृष्ट्या स्थायी स्वरुपात असतात, तसेच जास्तीत जास्त प्रमाणात एकाच वेळात तसेच कमी वेळात तयार करता येतात. याउलट, सकर्सपासून लागवड केल्यास खजूर झाडांचे यशस्वी होण्याचे खूप कमी आहे. 35% पेक्षा देखील कमी असते. तर बियांपासून लागवड केल्यास 50% नराच्या झाडांचे प्रमाण असते, आर्थिकदृष्ट्या व उत्पादांनाच्या दृष्टीने 50% तोटा होत असतो. याउलट बर्ही, मेदजुल, शरण इ. सारख्या जातींचे उतीसवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे साधारणता: 9x9 मी. अंतरावर लागवड केल्यास खजूर झाडाला 3 वर्षात फळे (खारीक) येण्यास सुरुवात होते. उतीसंवर्धन पद्धतीने तयार केलेले रोपे 52 अंश सें पर्यत तापमानास तग धरून राहतात.

 

खजूर झाडांमधील फळधारणा

खजूर झाड हे जनुकीय शास्त्रीय दृष्ट्या द्विलिंगी आहे, म्हणजे नर फुलांचे झाड व मादी फुलांचे झाड वेगवेगळे असतात. नरांच्या झाडांचे कार्य मादी फुलाच्या परागीभवनासाठी व फलण प्रक्रियेसाठी मह्त्वाचे असते. साधारणता: 100 मादी झाडांसाठी 2-3 नर झाडे पुरेपूर ठरतात. परागीभावत व फलन प्रक्रिया झाली तरच खारीक तयार होते.

परागीभवन

मादी फुले घडावर उमलली असता नरांच्या झाडापासून फुलाचे घड तोडून मादी झाडाच्या घडावर (गुच्छ्यामध्ये) ठेवून द्यावीत, जेणेकरून परागीभवन होऊन, फलनप्रक्रिया होऊन खारीक तयार होईल. अन्यथा, फळ लागत नाही.

घडांवर फळांची संख्या व झाडावर घडांची संख्या निश्चित करणे

पुढील वर्षच्या फलधारणेसाठी चालू वर्षात झाडावर घडांची व घडांमध्ये फळाची संख्या निश्चित ठेवणे गरजेचे असते. जेणेकरून घडांची संरचना मोकळी होईल घटट होणार नाही. जातीपरत्वे झाडावर घड व घडांमध्ये फळांची संख्यांना नियंत्रित करावी लागते. साधारणता: 5 वर्षाच्या झाडावर 3-5 घड संख्या निश्चित करावी. भारतीय (वातावरनात) हवामानानुसार एक झाडावर 8-10 घड पण ठेऊ शकतो. 1300-1600 खारीक फळे एका झाडावर नियंत्रित करू शकतो.

अतिरिक्त घडांची विरळणी

अतिरिक्त गदांतील फळांच्या संख्या नियंत्रित करण्यासाठी, घडातील आतील बाजूच्या स्ट्रँडची विरळणी करावी. अथवा जातीनिहाय, 1/3 किंवा 1/2 स्ट्रँड कट करून फुले काढून टाकावीत अशाप्रकारे जातीनुसार 25-50% घडांची विरळणी करावी.

खजूर अर्थकारण

  • 7x7 मीटर अंतरासाठी उतीसंवर्धित 82 रोपे तर 7x7 मीटर अंतरासाठी 50 रोपे लागतात.
  • रोपांची किंमत जातीनिहाय वेगवेगळी असते, साधरणता: 3500 ते 4500 रुपये प्रतिझाड. झाडांच्या संख्येनुसार 1.74 लाख ते 3.69 लाख रुपयांपर्यंत रोपांसाठी खर्च येऊ शकते.
  • तिसऱ्या वर्षापासून उत्पादनाला सुत्वत होते. उत्पादनाच्या पहिल्या वर्षी प्रतीझाड 30 किलो ओली खारीक, दुसऱ्या वर्षी 50 किलो तर तिसऱ्या वर्षी 200 किलो खारीक मिळते.  
  • ओली खारीक प्रतिकिलो 100 ते 200 रुपये दराने विकली जाते. यात जातीनिहाय व बाजार भावानुसार फरक होऊ शकतो, पाच वर्षानंतर प्रतिझाड 30 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. 

डॉ. साबळे. पी. ए
(सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात)
8408035772

date palm khajur खजूर खारीक kharik Barhi Dates बर्ही खजूर medjool dates मेदजुल खजूर
English Summary: date palm cultivation

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.