सद्यपरिस्थितीला पारंपरिक शेतीबरोबर अत्याधुनीक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास शेती व्यवसाय हमखास परवडू शकते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवळा तालुक्यातील खामखेडा येथील तरुण शेतकरी विशाल बच्छाव. विशाल बच्छाव या तरुण शेतकऱ्याने असे काही काम केलं आहे की सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
खामखेडा भागात बागायत जमीन मोठ्या प्रमाणात आहे. असं असलं तरी या भागातील शेतकरी मका, कापूस आणि भाजीपाला लागवड करण्यास प्राधान्य देत आहे. विशाल बच्छाव या तरुण शेतकऱ्याने स्वतःची तीन एकर शेतीसोबत चुलत्यांची चार एकर शेती वाट्याने करायला घेतली आहे. गेल्या तीन वर्षांपासून
ते टरबूज आणि भाजीपाला पीक घेत आहेत. या तरुण शेतकऱ्याने चार एकर शेतीत केवळ दोन ते अडीच महिन्यात १०० टनपेक्षा जास्त टरबूज उत्पादन घेतले असून यातून त्याला तब्बल १० लाख रुपयांची कमाई झाली आहे.
मागील वर्षी विशाल यांना टरबूजाचे उत्पन्न चांगले झाले होते, मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे व्यापार ठप्प असल्यामुळे त्यांनाही आर्थिक फटका बसला. यावर्षी मात्र विशाल यांनी फेब्रुवारीत ठिबक सिंचनाचा उपयोग करून आणि रोपांऐवजी बियाणे टाकत चार एकर क्षेत्रात लागवड केली. शेतीतील पूर्वनियोजन तसेच पाणी आणि फवारणीचे योग्य नियोजन केल्याने पीक देखील बहारदार आले, नुकतीच टरबूज पिकाची काढणी सुरू झाली असून चार एकर क्षेत्रात आतापर्यंत १०० टन टरबूज निघाले आहेत.
अजून १५ ते २० टन चांगल्या प्रतीचा माल निघण्याची शक्यता आहे तसेच दुय्यम माल देखील १० टनापर्यंत निघेल, असा अंदाज विशाल यांनी व्यक्त केला आहे.
सटाणा येथील व्यापारी टरबूज फळाची जम्मू काश्मीर येथे विक्री करत असतात, त्यामुळे विशालने पिकवलेले टरबूजसुद्धा जम्मू काश्मीरला विक्री करण्यासाठी गेले आहेत. टरबूज पिकाची लागवड करण्यापूर्वी विशाल यांनी टरबूज पीक चांगल्या प्रकारे कसे काढता येईल, हे अभ्यासले.
Ginger farming : शेतकऱ्याचे संकट काही संपेना; या कारणामुळे आले लागवड हुकली
त्यासाठी पीक नियोजनात गावातील शेतकरी मित्र तसेच परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीस भेट दिली. शेतीतील सर्व कामे कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून आणि स्वत:च्या देखरेखीखाली आवश्यक तेथे मजुरांची मदत घेत केले.टरबूजचा दर्जा आणि गोडवा चांगला असल्यामुळे पहिल्याच तोडणीत १०० टन टरबूज १० रुपये किलो दराने व्यापारांनी खरेदी केला. टरबूज लागवडीपासून ते उत्पन्न निघेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतल्यामुळे दर्जावान उत्पन्न निघाले.
महत्वाच्या बातम्या:
मानलं लेका! परदेशात शिक्षण घेतलं अन मायदेशी परतल्यावर शेती सुरु केली; आज लाखोंचे उत्पन्न
मोठी बातमी! SBI बँक आपल्या ग्राहकांना देत आहे सोन्याचे कॉइन; काय आहे ही खास स्कीम जाणुन घ्या
Share your comments