शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी फायद्याची आहे शेतकरी उत्पादक कंपनी

16 August 2020 04:37 PM


शेतकऱ्यांच्या बाबतीत करण्यात येणाऱ्या नवीन प्रयोगांमध्ये एक प्रयोग म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी हे होय. शेतकरी उत्पादक कंपनी भारतीय कंपनी अधिनियम 1956 यामध्ये 2002 मध्ये कलम एक मध्ये जो बदल करण्यात आला त्यानुसार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे प्रयोजन आहे.  शेतकरी उत्पादक कंपनी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व सहकारी संस्था या दोन्ही संस्थांना मिळणारे फायदे लक्षात घेऊन या कंपन्या निर्माण करण्यात येतात.  प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जे नियम व कायदे लागू होतात तेच नियम व कायदे शेतकरी उत्पादक कंपन्यांना हे लागू होतात.

 या कंपनीचे उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना एकत्र आणणे हे आहे. जर शेतकरी एकत्र आले तर ते कंपनीच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले शेती उत्पादन, प्रक्रिया तसेच विक्री केली तर उत्पादन खर्चात बचत होते. शेतकऱ्यांचे विक्री व्यवस्थापन मजबूत होते.  बाजार व्यवस्थेशी लिंक निर्माण झाल्यामुळे दलाल,  व्यापारी व इतर मध्यस्थांच्या हस्तक्षेप कमी होतो. असे बरेच फायदे शेतकरी उत्पादक कंपनीचे आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी सहकार तत्त्वानुसार चालत असल्यामुळे अनेक शेतकरी गट एकत्र येतात त्यामुळे शेतीची कार्यक्षमता वाढीस लागण्यास मदत होते.


शेतकरी उत्पादक कंपनी चे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या कंपनीला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. त्यामुळे तिचे व्यवस्थापन कार्यक्षमपणे करता येते. शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये बाह्य हस्तक्षेपाला वाव नसतो त्यामुळे तिचे कामकाज सुरळीत चालते. शेतकरी उत्पादक कंपनीवर अंतर्भूत असलेल्या सगळ्या शेतकऱ्याचे मालकी हक्क असतो. ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असते तसेच शेतकरी उत्पादक कंपनीला प्रशासकीय, तांत्रिक व व्यवस्थापकीय निर्णय घेण्याचे अधिकार असतात. शेतकरी उत्पादक कंपनीला कार्यकारिणी तयार करावी लागते. त्यामध्ये सभासदांमधून संचालक मंडळ निवडण्यात येते. त्यामध्ये संचालक,  उपाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य यांचा समावेश असतो. तसेच कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक व कृषी तज्ञ यांची नियुक्ती करणे आवश्यक असते. या संचालक मंडळातर्फे कंपनीच्या कामाचे नियमन केले जाते. शेतकरी उत्पादक कंपनी आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कायदे समान असतात. त्यामुळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कायद्यांची सखोल माहिती असणे आवश्यक असते. महाराष्ट्रामध्ये नाबार्ड व एसएफएसी यांच्याकडूनही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

शेतकरी उत्पादक कंपनीचे फायदे

शेतकरी उत्पादक कंपनीचे अनेक फायदे असतात. या कंपनीमार्फत प्रभावी संघटन तयार होतात, त्यामध्ये गुंतवणूक करणे, नवीन तंत्रज्ञान अद्ययावत करणे,  नवीन बाजारपेठ निर्माण करणे, विविध पिकांचे उत्पादन घेणे तसेच उत्पादित मालावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे बाय प्रॉडक्ट तयार करणे, कंपनीमार्फत खरेदी विक्री केंद्र उभारणे,  मालाची प्रतवारी करून मालाची श्रेणी ठरविता येते,  मालाची बाजारपेठेत मार्केटिंग करता येते तसेच मालाची कंपनीच्या नावाने ब्रँडिंग करता येते.

या कंपन्यांना नाबार्डकडून सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध होते तसेच सहकारी संस्थांना दिल्या जाणाऱ्या विविध योजना या कंपन्यांना दिल्या जातात. शेतकरी उत्पादक कंपन्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळण्यामध्ये सुलभता आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे या कंपनीला नोंदणीपासून पाच वर्षापर्यंत नफ्यावर कुठलाही कर द्यावा लागत नाही. या कंपन्यांना अवजारे आणि यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर व सुलभ हप्त्याने दिले जातात. इतकेच नाही तर SPAC, दिल्ली या संस्थेकडून उत्पादक कंपन्यांना 15 लाख रुपये पर्यंत किंवा प्रोजेक्टच्या 85% किंवा एक कोटी पर्यंतचे कर्ज विनातारण व कमी व्याज दराने दिले जाते.


शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीसाठी आवश्यक पात्रता

  • या कंपनी स्थापनेसाठी किमान दहा शेतकरी सभासद असावेत.
  • त्या दहा सदस्यांमधील पाच सदस्य संचालक असणे महत्वाचे असते.
  • प्रत्येक सदस्याचा सातबारा उतारा व शेतकरी असल्याचा दाखला आवश्यक असतो.
  • तसेच प्रत्येक सदस्याचे कायदेशीर दस्तावेज आणि इतर कागदपत्रांची आवश्यकता असते.

farmers farmer producers company Benefits of a farmer producer company शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी उत्पादक कंपनीचे फायदे
English Summary: A farmer's production company is beneficial for the economic upliftment of the farmers

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.