पीएम किसानच्या बोगस लाभार्थ्यांना परत करावे लागतील १३६४ कोटी रुपये; यात तुमचं तर नाव नाही ना

13 January 2021 01:51 PM By: KJ Maharashtra
PM Kisan

PM Kisan

पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे जवळजवळ २० लाख ४८ हजार अयोग्य लाभार्थ्यांनी १३६४  कोटी रुपये लाटले. यामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी हे पंजाब राज्याचे आहेत. त्यानंतर आसाम, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश चा नंबर येतो. या अयोग्य लाभार्थ्यांमधून अर्ध्यापेक्षा जास्त लाभार्थी काय करत आहेत, तसेच ४४.४१  टक्के शेतकरी या योजनेचे असलेली पात्रता पूर्ण करत नाही. कोणाच्या योग्य लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चुकीच्या मार्गाने घेतलेला पैसा जर परत केला नाही तर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

 सर्वाधिक अयोग्य लाभार्थी पंजाब मध्ये:

आरटीईनुसार मिळालेल्या माहितीनुसार पंजाब मध्ये सर्वाधिक म्हणजे ४.७४ लाख योग्य लाभार्थी आहेत. एकूण आयोग्य लाभार्थी पैकी २३.६ लाभार्थी पंजाबमध्ये राहतात. यानंतर १६.८ आयोग्या लाभार्थी आसाम राज्यात आहे. १३.९९ टक्के आयोग लाभार्थी महाराष्ट्रात आहेत. अशाप्रकारे आयोग्य लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या म्हणजे  ५४.३ टक्के फक्त या तीन राज्यात आहे.

हेही वाचा:अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता जानेवारीअखेर

कोणते आहेत अयोग्य लाभार्थी?

  • शेतकऱ्यांनाही माहिती नाही की जर घरामध्ये जर कोणी इन्कम टॅक्स भरणारा असेल तर अशा परिवाराला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. पती-पत्नी या दोघांपैकी तर मागच्या वर्षात इन्कम टॅक्स भरला असेल तर अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

  • जे व्यक्ती शेतजमिनीचा उपयोग कृषी साठी न करता इतर दुसऱ्या कामासाठी करत असेल तर असे व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहत नाही.

  •  बरेच शेतकरी शेती करतात परंतु ते दुसऱ्याची शेती भाड्याने करतात परंतु ते शेताचे मालक नसतात. अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळत नाही.

  •  बरेच शेतकरी शेती करतात परंतु शेतजमीन त्यांच्या नावावर नसते. आशा शेतकर्‍यांना सुद्धा योजनेचा लाभ मिळत नाही किंवा शेत संबंधितांच्या आजोबांच्या नावावर असेल या त्यांच्या वडिलांच्या नावावर असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळत नाही.

  •  जर कोणी शेतकरी जमिनीचा मालक आहे, परंतु तो रिटायर कर्मचारी आहे किंवा वर्तमान किंवा चालू खासदार, आमदार किंवा मंत्री असेल तर अशा व्यक्तींना पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच प्रोफेशनल रजिस्टर डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनीयर, आणि वकील अशा त्यांच्या परिवारातील लोकांना योजनेचा फायदा मिळू शकत नाही.

  • जर एखादा व्यक्ती शेताचा मालक आहे. परंतु त्याला दहा हजार रुपयांपेक्षा अधिक पेन्शन मिळते. तर अशा व्यक्ती या योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही.

PM-KISAN पंतप्रधान किसान सन्मान निधी RTI
English Summary: PM Kisan's bogus beneficiaries will have to pay back Rs 1364 crore, how to check if you are in it?

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.