1. बातम्या

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता जानेवारीअखेर

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील सुमारे ६२ लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात २ हजार २९७ कोटींची मदत दिली असून आता दुसऱ्या टप्प्यातील २ हजार २११ कोटीची मदत जानेवारीअखेर वितरित केली जाणार आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता येणार

नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता येणार

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील सुमारे ६२ लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात २ हजार २९७ कोटींची मदत दिली असून आता दुसऱ्या टप्प्यातील  २ हजार २११ कोटीची मदत जानेवारीअखेर वितरित केली जाणार आहे.

त्यासाठी ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही त्या शेतकर्‍यांसह त्यांच्या क्षेत्राची जिल्हानिहाय माहिती संकलित केल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली.मागील काही महिन्यांमध्ये अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पार्श्वभूमीवर मदतीची पहिल्या टप्प्यातील रक्कम पूर्णपणे वाटप झाली असून आता दुसऱ्या टप्प्यातील मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. यावर्षी बळीराजाला परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला.

हेही वाचा :राज्यातील मत्स्यव्यवसाय वाढीसाठी नाबार्डचे केंद्र शासनाबरोबर त्रिपक्षीय करार

हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात वाहून गेली तसेच मातीमोल झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्ज काढून बळीराजाला मदत केली. यासंदर्भात पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्कम नुकसानग्रस्त त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. आधीच धोरणामुळे संकटाचा सामना करीत शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर कर्जाचा डोंगर वाढू लागला आहे, या पार्श्वभूमीवर सरकारकडून वितरित होणारी मदतीचे रक्कम कोणत्याही बँकांनी कर्जापोटी वर्ग करू नये त्यासंबंधीच्या आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत.

हेही वाचा :अनुसूचित जमातींना कृषी विकास योजनांसाठी 50 कोटींचा निधी

 

नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनातील पूर्वी मागणीद्वारे अतिवृष्टीच्या भरपाईसाठी रक्कम मंजूर झाले. त्यानंतर जिल्हानिहाय मदतीपासून वंचित शेतकरी व त्यांचे क्षेत्र यांची माहिती संकलित करून त्यांच्यासाठी मदतीची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे पुढील आठवड्यापर्यंत वितरित केली जाईल, असेही मदत व पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

English Summary: Second installment of compensation due to heavy rains by end of January Published on: 07 January 2021, 03:22 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters