1. बातम्या

भन्नाट आँफर : तिसरे बाळ जन्माला घाला आणि मिळवा ११ लाख रुपये

तरुणांचा देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे. भारतामध्ये (India) वाढती लोकसंख्या (Population) मोठी समस्या झाली असताना चीनमध्ये (China) मात्र वृद्धाची संख्या वाढत आहे. तरुणांचे प्रमाण कमी कमी झाले आहे.

तिसरे बाळ जन्माला घाला आणि मिळवा ११ लाख रुपये

तिसरे बाळ जन्माला घाला आणि मिळवा ११ लाख रुपये

तरुणांचा देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे. भारतामध्ये (India) वाढती लोकसंख्या (Population) मोठी समस्या झाली असताना चीनमध्ये (China) मात्र वृद्धाची संख्या वाढत आहे. तरुणांचे प्रमाण कमी कमी झाले आहे. त्यामुळे चीनमध्ये तीसऱ्या मुलाला जन्म देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

त्यासाठी सरकार (Government) आणि कंपन्यांकडून लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येत आहेत. बिजींग देबेइंग औंग टेक्नोलॉजी या चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांनी तीसरे बाळ जन्माला घातल्यानंतर ९ ० हजार युआन म्हणजे जवळपास ११ लाख रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. जर महिला कर्मचारी तिसऱ्या मुलाला जन्म असेल तर तीला पूर्ण वर्षासाठी सुटी जाहीर करण्यात येत आहे. तर पुरुष कर्मचाऱ्याला ९ महिन्यांची सुटी देण्यात येत आहे.

Aadhar Card: आधार कार्ड हरवले तर काळजी करू नका; ते असे मिळवा परत...

कर्मचाऱ्याने दुसरे बाळ जन्माला घातल्यानंतर ६० हजार युआन म्हणजे जवळपास ७ लाख रुपये बोनस देण्यात येत आहे. पहिले बाळ जन्माला घातल्यानंतर कर्मचाऱ्यांना ३० हजार युआन म्हणजे ३.५० लाख रुपयांचा बोनस जाहीर करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी चीनमध्ये झपाट्याने वाढणारी लोकसंख्या (Population) रोखण्यासाठी एक मूल धोरण स्वीकारण्यात आले.

LPG सिलिंडर ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता अपघात झाल्यास मिळणार बंपर फायदा...

या पावलानंतर लोकसंख्या कमी झाली, पण त्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागला. अशा परिस्थितीत आता चीनने तरुण कुटुंबांना २ किंवा ३ मुले जन्माला घालण्यास प्रवृत्त करण्यास सुरुवात केली आहे. (वृत्तसंस्था)

शेतकऱ्याचा नादच खुळा..! बनवला बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर; जाणून घ्या वैशिष्ट्ये

English Summary: Add the third child and get Rs 11 lakh Published on: 09 May 2022, 03:23 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters