मेष
मेष (Aries) राशीच्या लोकांना सूचित केले जाते की, आज अति विचार करणे टाळा. तसेच धार्मिक कार्यासाठी तुम्ही वेळ द्याल. शक्यतो आज पैसे देण्या-घेण्याचे व्यवहार करणे टाळा. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांच्या खुशालीची बातमी मिळेल. शुभरंग : पांढरा (white)
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना आज मेहनत (hard work) घेण्याची आवश्यकता आहे. हसतमुख राहतील,माहित नसलेल्या कामाबाबत माहिती करून घ्याल. लाल रंगाचा पोषाख परिधान कराल. समाजातील लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. शिवाची पूजा करा. शुभरंग : जांभळा
मिथुन
मिथुन राशीची लोक घरातील समारंभात सहभागी होतील. ध्यानधारणेची गोडी लागेल. अर्धवट राहिलेले शिवणकाम पूर्ण कराल. पुस्तक वाचनात वेळ घालवाल. आराध्यदेवतेचे दर्शन घ्याल. समाजात मान मिळेल. घरातील फुलदाणीत गुलाबाची फुले ठेवा. शुभरंग : पिवळा
कर्क
घरात सुशोभिकरणाचे (beautify) काम कराल. प्रिय व्यक्तिची अनपेक्षित भेट होईल. लहान मुलांमध्ये रमाल. संगीताची गोडी लागण्याची शक्यता आहे. नातेवाईक अनपेक्षितपणे घरी येण्याची शक्यता आहे. घरातील लहान मुलांची आवड पुरवाल. शुभरंग : मोती
Weather Update: विदर्भात विजांच्या कडकडाटासह धो-धो बरसणार पाऊस; 'या' भागांना यलो अलर्ट जारी
सिंह
सोने खरेदी करण्याची इच्छा होण्याची शक्यता आहे. इतरांपेक्षा स्वत:च्या चुकांकडे लक्ष द्या. मनात कोणाविषयीही पूर्वग्रह ठेवू नका. सायंकाळी कुटुंबियांसोबत सिनेमा पाहायला जाल. सकाळी तुळशीला पाणी घाला. वेशभूषेत बदल करावासा वाटण्याची शक्यता आहे. शुभरंग : लाल
कन्या
जोडीदाराला (partner) आज तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. आहारात अतितिखट पदार्थ टाळा. गोड खावेसे वाटेल. आजचा दिवस आपल्यासाठी शुभदायक आहे. आवडीच्या रंगाचा पोषाख खरेदी कराल.
शुभरंग : आकाशी
तूळ
सहलीला जाण्याचे नियोजन आखाल. आवडती फुले प्रिय व्यक्तिकडून भेट स्वरुपात मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात भाग घ्याल. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. मिळालेला रिकामा वेळ पुस्तक वाचन, संगीत यामध्ये घालवाल. व्यवसायात नव्या संकल्पना सुचण्याची शक्यता आहे. शुभरंग : केशरी
वृश्चिक
दागिन्यांची खरेदी कराल. पुस्तकांचे वाचन करण्यात वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्या. स्वत:साठी वेळ काढा. आवडत्या विषयाचा अभ्यास कराल. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करा. शुभरंग : खाकी
Crop Management: पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता वेळीच ओळखा; मिळेल भरघोस उत्पन्न
धनु
प्रिय व्यक्तिचा सहवास लाभेल. वाणसामानाच्या खरेदीकरिता वेळ काढाल. मासिके, कथा, कादंबऱ्या वाचनात वेळ घालवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबियांसोबत सिनेमाला जाण्याचा प्लान आखाल. आर्थिकदृश्या आजचा दिवस लाभदायक आहे. शुभरंग : गुलाबी
मकर
मन:स्वास्थ्य राखण्यासाठी ध्यानधारणा कराल. घरातील पाळीव प्राण्याची काळजी घ्या. आरोग्य चांगले राहिल. सकाळी लवकर उठा. लहान मुलांना गूळ-चणे द्या. बोलताना मधुरावाणीचा वापर करा. मित्रांच्या भेटीगाठी होतील. शुभरंग : काळा
कुंभ
सहलीला जाण्याचे नियोजन कराल. घरातील तांत्रिक वस्तूंची वेळीच दुरुस्ती करून घ्या. आवडती कला जोपासाल. सकाळी शिवमंदिरात जाऊन अभिषेक करा. नको त्या गोष्टींची चौकशी करण्यात वेळ वाया घालवू नका. घरातील मोठ्या व्यक्तिंचे आशीर्वाद घ्याल. पारिजातकाचे झाड अंगणात लावा. शुभरंग : खाकी
मीन
साहित्य, कला, संगीत यांचा आनंद घ्याल. व्यवसायात मन रमवाल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराला समजून घ्यावे लागेल. पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान करा. गणपतीची उपासना कराल.
शुभरंग : पिवळा
महत्वाच्या बातम्या
Castor Farming: एरंडेल शेतीतून लाखोंची कमाई घेण्यासाठी 'या' खास पद्धतीचा अवलंब करा; जाणून घ्या
Diabetes Solution: मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी गुळवेलसह या पानांचा वापर करा; होईल फायदा
Planting Bananas: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता रोहयोअंतर्गत होणार 'या' पिकाची लागवड; अनुदानाचा मिळणार लाभ
Government Scheme: 'या' योजनेत फक्त एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट नफा
Share your comments