चांगल्या भविष्यासाठी तुम्हाला आतापासून गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसच्या काही महत्वाच्या योजणांविषयी माहिती असणे गरजेचे आहे. पोस्ट ऑफिसच्या (post office) लहान बचत योजना सर्वसामान्यांसाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात.
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये (Recurring Deposits) तुम्ही 100 रुपयांच्या छोट्या रकमेसह 16 लाख रुपयांचा मोठा निधी तयार करू शकता.पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये फक्त 100 रुपयांच्या छोट्या रकमेसह गुंतवणूक सुरू करू शकतात. यामध्ये कमाल मर्यादा नाही.
ही योजना शासनाच्या हमी योजनेसह येते. आवर्ती ठेव (RD) तुमच्या सोयीनुसार 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठी उघडता येते. त्यात जमा केलेल्या पैशावर तिमाही व्याज आकारले जाते. प्रत्येक तिमाहीच्या शेवटी, तुमचे खाते जोडले जाते.
आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान ठरण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
५.८ टक्के व्याज उपलब्ध
आवर्ती ठेव योजनेवर (Recurring Deposit Scheme) 5.8% व्याज उपलब्ध आहे, हा नवीन दर 1 एप्रिल 2020 पासून लागू होईल.
केंद्र सरकार (central government) प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित करते. तुम्ही या योजनेत दरमहा 10,000 रुपये गुंतवल्यास, तुम्हाला मुदतपूर्तीच्या वेळी 16.28 लाख रुपये मिळतील.
LIC च्या जीवन प्रगती योजनेमध्ये दररोज 200 रुपये जमा करा आणि मॅच्युरिटीनंतर मिळवा 28 लाख रुपये
म्हणजेच तुम्ही स्वत:साठी मोठा निधी उभारू शकता. तुम्हाला 10 वर्षांसाठी 10,000 रुपये जमा करावे लागतील आणि नंतर मॅच्युरिटीवर 16.28 लाख रुपये मिळतील. कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिस किंवा घराजवळील कोणत्याही शाखेत जाऊन हे खाते उघडू शकते.
महत्वाच्या बातम्या
कृषी विद्यापीठाकडून नवीन ट्रॅक्टरचलित यंत्र लॉन्च; अशाप्रकारे करा उसातील आंतरमशागत
आनंदाची बातमी! आता गॅस सिलिंडर मिळणार फक्त 750 रुपयांमध्ये; आजच करा बुकिंग
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सूक्ष्म सिंचनासाठी तब्बल 666 कोटींचे अनुदान जाहीर
Share your comments