केंद्र सरकार आणि राज्य सरकार लोकांच्या हितासाठी, त्यांना सुखसोयींचा अनुभव घेता यावा याकरिता वेगवेगळ्या क्षेत्रात बऱ्याच योजना आणत असतात. त्यातल्या त्यात देशातील गरीब घटकांसाठी सरकार अनेक योजना आणत असतात. सोबतच महिलांच्या स्वास्थ्य आणि जीवनमान कसे सुधारता येईल याकडेही सरकारचे लक्ष असते. आजही कित्येक ग्रामीण भागात महिला चुलीवर स्वयंपाक करतात. त्यातून महिलांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न उपस्थित झाले. धुरामुळे डोळ्यांवर तसेच शरीरावर गंभीर परिणाम होऊ लागले. या प्रदूषणाला महिला बळी पडत होत्या. शिवाय त्यातून पर्यावरणाचा देखील प्रश्न उपस्थित झाला.
त्यामुळे 1 मे 2016 रोजी सरकारने देशातील गरीब वर्गाला गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत सरकारी एपीएल आणि बीपीएल कार्डधारकांना गॅस सिलिंडरची सुविधा मोफत मिळते. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या योजनेला सुरुवात केली होती. या योजनेमार्फत सरकार दारिद्र्यरेषेखालील आणि एपीएल कार्डधारकांना मोफत गॅस सिलिंडर देते.
आतापर्यंत केंद्र सरकारने करोडो महिलांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप केले आहे. या योजनेसाठी महिलांचे वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक असते.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी पात्रता :
दारिद्र्यरेषेखालील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. फक्त या लोकांकडे बीपीएल म्हणजेच दारिद्रय रेषेखालील शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
नागरिक जर वनवासी किंवा मागासवर्गीय असेल तर ते नागरिकसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शिवाय तुमच्याकडे आधीपासूनच गॅस कनेक्शन नसावे.
घरातील महिलेचे वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. तसेच बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी ही कागदपत्रे जवळ असणे आवश्यक :
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज असते. आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, मोबाईल नंबर, बँक पासबुकची प्रत
रेशन कार्ड, BPL कार्ड
अर्ज कसा करावा?
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन अर्जदेखील करू शकता. यासाठी pmujjwalayojana.com या त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. येथून एक फॉर्म डाउनलोड करा. हा फॉर्म भरून तुम्ही तो एलपीजी केंद्रात जमा करा. यानंतर तुम्हाला नवीन एलपीजी कनेक्शन सहज मिळेल.
महत्वाच्या बातम्या:
भेंडवळची भविष्यवाणी आली! यावर्षी राहणार पावसाळा सर्वसाधारण, तिसऱ्या व चौथ्या महिन्यात भरपूर पावसाचे भाकीत
भारतीय खाद्य महामंडळाकडून 'फुले विक्रम' जातीच्या हरभरा खरेदीस टाळाटाळ, ही आहेत त्यामागील कारणे
आता 'या' कारणामुळे बिअरचे दर वाढणार...
Share your comments