लहान बचत योजनांद्वारे मोठी रक्कम जमा केली जाऊ शकते. पोस्ट ऑफिसच्या (post office) अनेक योजना आहेत ज्यात भरपूर व्याज मिळते. या योजनांमध्ये पैसे जमा केल्याने रक्कम झपाट्याने वाढते आणि अनेक योजनांद्वारे करात सूटही मिळते. आज आपण अशाच पोस्ट ऑफिसच्या 4 योजनांबद्दल माहिती आहोत.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना
पोस्ट ऑफिस (post office) लहान ठेवीदारांसाठी काही सर्वोत्तम व्याजदर ऑफर करते जे दीर्घ कालावधीसाठी हमी परतावा शोधत आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजनेचे नाव आहे. या योजनेत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळते.
गुंतवणूकदार पीपीएफ खात्यात वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. सर्वांत उत्तम म्हणजे, ठेवी मासिक किंवा त्रैमासिक किंवा वार्षिक आधारावर केल्या जाऊ शकतात. गुंतवणूकदार PPF खात्यात 15 वर्षे सतत गुंतवणूक करू शकतात.
महाराष्ट्रात 'यलो अलर्ट' जारी; नागरिकांना सतर्क राहण्याचा हवामान विभागाकडून इशारा
नॅशनल सिक्युरिटी स्कीम योजना
पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये NSC ही देखील एक मोठी परतावा योजना आहे. हे कलम 80C अंतर्गत कर लाभांसह हमी परतावा देखील देते. नॅशनल सिक्युरिटी स्कीम (National Security Scheme) एक निश्चित रिटर्न ऑफर करताना प्रिन्सिपल सुरक्षित ठेवते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत ठेवी ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकार ६.८ टक्के दराने व्याज देते.
सुकन्या समृद्धी योजना योजना
बचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना (suknya samrudhhi scheme) ही एक उत्तम योजना आहे. सुकन्या समृद्धी योजनेत इतर योजनांपेक्षा जास्त व्याज मिळते. यामध्ये खूप कमी पैसे गुंतवल्यास तुम्हाला मोठी रक्कम मिळते.
जर तुम्ही इतर लहान बचत योजनांशी तुलना केली तर सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेल्या रकमेवर प्राप्तिकरातही सूट आहे. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मिळणाऱ्या व्याजावरही कर आकारला जात नाही. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यावर ७.६ टक्के दराने व्याज दिले जात आहे.
एलआयसीच्या 'या' योजनेत फक्त 122 रुपये गुंतवा आणि मिळवा 26 लाख रुपयांचा परतावा
किसान विकास पत्र योजना
किसान विकास पत्र (KVP) ही एक लोकप्रिय पोस्ट ऑफिस योजना आहे. यामध्ये सरकार दरवर्षी ६.९ टक्के चक्रवाढ व्याज देत आहे. प्रचलित व्याजदरानुसार, ते 10 वर्षे आणि 4 महिन्यांत तुमची ठेव रक्कम दुप्पट करू शकते. तुम्ही आज 1 लाख रुपये KVP ठेव सुरू केल्यास, पुढील 124 महिन्यांत ती 2 लाख रुपये होईल.
महत्वाच्या बातम्या
सावधान! लंपी स्किन आजारामुळे जनावरांच्या जीवाला पसरतोय धोका; रोखण्यासाठी करा 'हे' उपाय
सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; मिळतोय 'इतका' दर
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे नवीन दर
Share your comments