दि.१६ जून गुरुवार, गिरोली बुद्रुक, ता.देऊळगाव राजा, जि.बुलढाणा देऊळगाव राजा येथील समर्थ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून ग्राम गिरोली बु. येथील शेतकऱ्यांना (पशुपालकांना) चारा उपचाराचे प्रात्यक्षिक देण्यात आले. निकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस चाऱ्या मध्ये तसेच चाऱ्याचा पोषणमूल्यांच्या पूर्ण उपयोग करण्याकरिता चाऱ्यावर युरिया, गुळ, मीठ हे ई.चे मिश्रण करून चाऱ्यावर प्रक्रिया केल्यास निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढते. चाऱ्याची चव, पाचकता व त्यातील नत्राचे प्रमाण वाढते.
त्यामुळे जनावरे (गाई - म्हशी) चारा आवडीने खातात. पशुपालनामध्ये सर्वाधिक खर्च हा त्यांच्या चारा व पशुखाद्यावर होतो. ग्रामीण भागात जनावरांसाठी शेतातील उत्पादित पिकाचा चारा म्हणून उपयोग केला जातो. उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने पाण्याच्या कमतरतेमुळे चारा घेणे अशक्य होते, या वेळेस जनावरांना फक्त उत्पादित पिकांचा वाळलेला चारा म्हणून उपयोग होतो.बाजारपेठेत तयार चाऱ्याची सरासरी १० ते १२ रु प्रतिकिलो दराने विक्री होते. परंतु, अशा चाऱ्याची गुणवत्ता चांगली असेलच याची खात्री नसते.
जर प्रत्येक पशूपालकाने त्यांच्या गुरांच्या चाऱ्यावरती चारा प्रक्रिया केली तर हे नक्की त्यांना फायद्याचे ठरेल, यामुळे पशूपालकांचे खर्च वाचेल, चारा वाया जाणार नाही,पशूंना योग्य प्रकारात पोषक आहार भेटेन व पशू चे आरोग्य चांगले राहील. असे काही महत्त्व कृषी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले यावेळी शेतकरी नारायण देशमुख ,प्रल्हाद देशमुख,किसन सानप, अहीलाजी झिने, हरी तिडके, विश्वनाथ मगर, भानुदास जाधव हे शेतकरी उपस्थित होते.
यावेळी महाविद्यलयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे, रावे समन्वयक प्रा. मोहजीतसिंग राजपूत, तसेच पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग प्रा.सचिन गोरे हे उपस्थित होते. तसेच समर्थ कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आकाश पवार, ऋषिकेश पडघान, महेंद्र पंडित, जयदीप पाबळे, निखिल राव, पोकला श्रीनिवास, मधुबाबु, आदित्य श. पाटील,आदित्य म. पाटील, अभिषेक निस्ताने हे कृषिदूत उपस्थित होते.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments