नदीपात्र पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्याची स्वछतादेखील तितकीच महत्वाची आहे. पाण्याचा स्रोत म्हणून नद्यांचा प्रामुख्याने वापर केला जातो.वाहतुकीसाठी, वीजनिर्मिती, तसेच मोठी यंत्रे चालवण्यासाठीही नद्यांचा वापर केला जातो. मात्र आता नद्यांचा वापर वेगळ्याच कारणांसाठी होऊ लागला आहे. औद्योगिकीकरण व शहरांची घाण वाहून नेण्यासाठी नदीपात्राचा वापर होत असल्याचे आपल्या सगळ्यांना माहित आहे. मात्र रायगडच्या महाड औद्योगिक वसाहतीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वापरलेले कोरोना चाचणी कीट थेट औद्योगिक वसाहतीच्या नदीपात्रात आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांकडून कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व तातडीने दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महाड औद्योगिक वसाहतीत प्रदुषणाची समस्या कायम आहे. आणि त्यात आता भर म्हणून चक्क वापरलेले कोरोना चाचणी कीटस टाकण्यात आले आहेत.
सध्या राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अशातच कोरोना कीट्स नदीपात्रात सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. कधी नदीपात्रात हिरवं, काळं, लाल पाणी वाहणं तर कधी सांडपाणी लिकेज होणं यामुळे येथील स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, एमआयडीसी आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे.
शेणामुळे झाला जबरदस्त फायदा; 'या' देशाकडून भारताला आली सर्वात मोठी मागणी
तसेच याचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले आहेत. महाड एमआयडीसीतील प्रदुषणाने आम्ही त्रस्त झालो आहोत अशी भावना स्थानिक ग्रामस्थ संदीप देशमुख यांनी व्यक्त केली आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आता मागणी होत आहे. या भागात जे बायोमेडीकल वेस्ट आढळे असून त्याची लवकरच तपासणी करण्यात येईल आणि संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल असे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, संदीप सोनावणे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
साखर कारखाने बंद, ऊस अजूनही शिल्लक, आता 'स्वाभिमानी' करणार पोलखोल
एकाच दिवशी,एकाच जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू; जिल्ह्यावर कोसळला दुःखाचा डोंगर
Share your comments