1. बातम्या

जाणून घ्या शाश्वत शेती काय असते

KJ Maharashtra
KJ Maharashtra
जाणून घ्या शाश्वत शेती काय असते

जाणून घ्या शाश्वत शेती काय असते

जगभरातील लोकसंख्या वेगाने वाढत असून हा धोका वेळीच ओळखून आधुनिक शेतीपद्धतीला आपलेसे करणे काळाची गरज आहे परंतु यामध्ये उत्पादन वाढीसाठी केलेला अमर्यादित रासायनिक खतांचा वापर व वृक्षांची कत्तल यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला यामुळे खाद्य पदार्थाच्या गुणवत्तेत कमी आली.

यावर उपाय म्हणजे जंगल आणि गवताळ वने टिकवणे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नपुरवठा करण्यासाठी म्हणूनच जास्त जमीन शेतीखाली आणणे अशक्य आहे. यावर उपाय म्हणून कमीत कमी पाणी, जमिनीचा वापर आणि हवामानाशी जुळवून घेणा-या आधुनिक शेतीकडे वळण्याची हीच वेळ आहे.
यावर उपाय म्हणून शाश्वत शेतीकडे पाहिले जाते आहे.

शाश्वत शेती:-

शाश्वत शेती म्हणजे जमीन, पिके, वने, पशुधन, वन्यजीव, मासे, पर्यावरण, इत्यादी पुनःर्जीत। करण्याजोगे स्तोतांच्या प्रतवरीचा घसारा न करता भावी पिढीसाठी अन्न, वस्त्र, निवारा, याचा पुरवठा करणे होय. शाश्वत शेतीला आपण सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, पर्यावरण शेती असेही म्हणतो.या शेतीत पर्यावरण संतुलनाला महत्व दिले जाते.भावी पिढीला आवश्यक असणाऱ्या मूलभत स्रोतांना कोणत्याही प्रकारची हानी न पोहचवू देता वर्तमान पिढीच्या गरजा भागविण्यासाठी केलेली शेती.

भारत शाश्वत शेतीचा प्रसार होण्यासाठी कार्यरत आहे,यासाठी विविध अभियान राबवले जात आहे.यामध्ये नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ऍग्रीकलचर(NMSA) हे राष्ट्रीय अभियान कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे.हे अभियान विशेषतः पर्जन्य आधारित भागासाठी, एकात्मिक शेती, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन ,पाण्याचा कार्यक्षमतेने वापर, व नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे.

 

शाश्वत शेतीचे फायदे:-

1) पर्यावरनाचे संतुलन राखणे हा शाश्वत शेतीचा महत्त्वाचा फायदा आहे .
2) शुद्ध पर्यावरण आणि कोणतेही हानिकारक घटक नसलेले पदार्थ या शेतीपद्धत्तीद्वारे दिले जाते।
3) मातीची भौतिक, रासायनिक, व जैविक रचना संरक्षित करणे व सुधारणे.
4) या शेतीमध्ये पीक उत्पादन खर्च कमी असतो.

सौरभ संजय नाईक
Vllth Sem(RAWE)
कृषी महाविद्यालय ,आमखेडा
प्रतिनिधि - गोपाल उगले

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters