शेतकरी शेती करतात. परंतु या शेतीच्या मालकी हक्कावरून किंवा कसण्याच्या प्रकारावरून शेतजमीन धारकाचे प्रकार पडतात. त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊन.
शेतजमीन धारकाचे प्रकार
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,1966 अन्वये शेत जमीन धारकांच्या खालील तीन प्रकार पडतात.
1- भोगवटादार-1
2- भोगवटादार-2
3- शासकीय पट्टेदार
भोगवटादार -1
भोगवटादार एक म्हणजे ज्या शेत जमिनीचा मालक शेतकरी स्वतः असतो. अशा जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी त्या शेतकऱ्यावर कोणाचे बंधन किंवा कोणत्याही प्रकारचे बंधन किंवा परवानगीची आवश्यकता नसते.
अशा शेतजमिनीला बिन दुमाला किंवा खालसा जमीन असे देखील म्हणतात. ( भोगवटादार वर्ग 1 ची व्याख्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, कलम 29(2)मध्ये नमूद करण्यात आली आहे.
भोगवटादार वर्ग दोन
भोगवटादार दोन म्हणजे ज्या शेत जमिनीचा मालक शेतकरी स्वतः नसतो.अशा जमिनीचे हस्तांतरण करण्याच्या हक्कावर शासनाचे निर्बंध असतात.जर अशा जमिनीची विक्री करायची असेल तर त्या शेतकऱ्यावर काही बंधने किंवा अटी असतात आणि त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगी किंवा सकाळी शासकीय सोपस्कार पूर्ण करण्याची आवश्यकता असते.
नक्की वाचा:असे केल्यास शेतीत संपन्नता दिसायला लागणार, देश टिकवायचा असेल तर शेतकरी जगवावाचं लागेल
अशा शेतजमिनीला दुमाला किंवा नियंत्रित सत्ता प्रकारची, शर्तीची जमीन असे देखील म्हणतात. ( भोगवटादार वर्ग 2 ची व्याख्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 कलम 29 (3) मध्ये नमूद करण्यात आली आहे. भोगवटादार वर्ग-2 ची नोंद गाव नमुना क्रमांक 1 क मध्ये ही केली जाते.
शासकीय पट्टेदार
शासकीय पट्टेदार म्हणजे जालन ठराविक मुदतीसाठी शासनाकडून वहीवाटण्यासाठी जमीन भाडे तत्वावर देण्यात आली आहे अशा व्यक्ती शासकीय पट्टेदार लाभधारक या प्रकारात मोडतात. (शासकीय पट्टेदार ची व्याख्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,1966, कलम 2 (11)मध्ये नमूद करण्यात आली आहे.
नक्की वाचा:काकडी पिकाचे भरघोस उत्पन्न घ्यायचे आहे? तर मग असे करा व्यवस्थापन
Share your comments