1. कृषीपीडिया

असे केल्यास शेतीत संपन्नता दिसायला लागणार, देश टिकवायचा असेल तर शेतकरी जगवावाचं लागेल

एकदंरीत रासायनिक अन्नद्रव्यांच्या बाबतीत फक्त भारतातच एवढा मोठ्या प्रमाणावर गोंधळ चालु आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
असे केल्यास शेतीत संपन्नता दिसायला लागणार, देश टिकवायचा असेल तर शेतकरी जगवावाचं लागेल

असे केल्यास शेतीत संपन्नता दिसायला लागणार, देश टिकवायचा असेल तर शेतकरी जगवावाचं लागेल

एकदंरीत रासायनिक अन्नद्रव्यांच्या बाबतीत फक्त भारतातच एवढा मोठ्या प्रमाणावर गोंधळ चालु आहे.

हे रासायनिक घटक जास्त झाले की दुसरे घटक कमी होतात ,आणि ते रासायनिक घटक कमी झाले की हे घटक जास्त होतात. यात शेतकरी बांधव विनाकारण गोंधळतो व भरकटला जातो. काही तज्ञ मंडळी लगेच शार्टकट उपाय सुचवुन मोकळे होतात तोपर्यंत कंपन्यांचा सेल ही झालेला असतो . मात्र इकडे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढलेला असतो. पिकांमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्यासाठी ह्रयावर शाश्वत उपाययोजना ही आहेत त्यावर कोणत्याच केमिकल कंपन्या बोलायला तयार नाहीत.

जमिनीच्या सुपिकतेवर जर व्यवस्थित काम केले व रासायनिक अन्नद्रव्यांचा जर समतोल वापर केला तर हे सगळे प्रश्न सुटतील.

मी सुध्दा रासायणिक खतांच्या विरोधात नाही कारण पिकांचे न्युट्रीशन साठी रासायणिक खतांची काही प्रमाणात गरज ही भासणारच. परंतु गरजेपुरता समतोल वापर करावा एवढेच .

मित्रांनो मी 2010/11 मध्ये अफ्रीकेतीलसुदान व इथोपिया ह्या दोन्ही देशात एक वर्षाकरीता अँग्रीकल्चर प्रोजेक्ट वर काम करीत असतांना .तिथील नाईल नदिच्या काठावरची शेती बघितली व अनुभवली .तिथे मी कोणत्याही प्रकारची युरीया व अन्य डि ए पी सारख्या रासायणिक खताच्या वारेमाप वापर करताना शेतकरी मी बघितला नाही.आज ही तिथे अतिशय अल्प प्रमाणात रासायनिख खत वापरून ( 10 किलो / एकर) तिथील पिकांचे उत्पन्न ( बाजरा , ज्वारी ,मका ) उत्पन्न आपल्यापेक्षा दुपटीने जास्तत्याचे कारण म्हणजे तिथील जमीनीत सेंद्रिय कर्ब ही लेवल 5 ते 7 % च्या पुढे व उपयुक्त जिवाणुंची संख्या मुबलक.

परंतु आपल्याकडील जमिनीच्या सेंद्रिय कर्बाची स्थिति वाळवंटा सारखी किवा त्यापेक्षाही खालावली आहे. जास्तीत जास्त रासायनिक खत व किटकनाशकामुळे जमिनीचे व भुजलाचे प्रदुषित झालेले आहे.

सुपिक जमिनीचा आत्मा म्हणजे सेंद्रिय कर्ब ( organic carbon ) आहे. आणि बँक्टेरिया ना पिकांचा ब्रेन म्हणतात.

जिवाणू नेहमी कर्बच्या (organic carbon ) च्या सोबत सावलीप्रमाने असतात.

पूर्वी आपल्या मातीत 3% च्या वर सेंद्रिय कर्ब होता त्यामुळे थोड़े रासायनिक ख़त टाकले तरी पिक भरघोस पिकायचे पण आज तो सेंद्रिय कर्ब 3 वरुण 10 पटीने कमी होवून 0.3 पर्यन्त खाली आला त्यामुळे रासायनिक खते टाकून ही पिक रोगट होत आहेत.

हे अगदी खरे की जमिनीला जिवंतपना आणनारे जिवानुच ( बँक्टेरिया) आहेत पण जिवानुना आपल्या मातीत अन्न उरलेले नाही त्यामुळेच ते आपल्याला पुन्हा पुन्हा बाहेर लँब मध्ये वाढवून टाकावे लागतात.

एक उदाहरण देतो.

जर आपल्याला मुंग्या गोळा करायच्या असतील तर त्यांना शोधून आणन्यापेक्षा साखर टाकली की त्या आपोआप गोळा होतील त्याप्रमाणे जिवाणु सतत बाहेरून सोडण्या ऐवजी त्यांना आवश्यक ह्यूमस किंवा सेंद्रिय कर्ब भरपूर असलेले सेंद्रिय पदार्थ जमिनित टाकले की जिवाणू झपाट्याने वाढतील म्हणजे शेतकऱ्यांनी जिवाणू वाढविन्याचा प्रयन्त करण्या ऐवजी त्यांचे अन्न अर्थात सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवा.

म्हणतात ना. असतील शिते तर जमतील भूते म्हणजे जिवाणू काउंट वाढवला की सगळे प्रश्न सुटतील पण त्यासाठी जमींनीत सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे.

जिवाणू हे मातीतिल आचारी आहेत त्यांचे अन्न म्हणजे सेंद्रीय कर्ब व त्यांना पोषक वातावरण हवे .

जिवाणु हे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये शिजवुन पिकांना मुळांद्वारे देण्याचे काम करतात.जर सर्व प्रकारचे उपयुक्त जिवाणु व बुरश्या जमिनीत असतील तर सर्व प्रकारचे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य पिकांना मिळतात हेच मुळ शास्त्र आहे.

जमिनीतील अन्नद्रव्य झाडाला उपलब्ध करुन देण्यासाठी व रोग किड विरूध्द लढण्याची रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर आपल्या जमीनीत उपयुक्त जिवाणु व बुरशी ( bacteria / fungus ) असणे ही काळाची गरज आहे.

जिवाणुंची (bactreria ) व सेंद्रिय कर्ब ( आर्गेनिक कार्बन) चे मातीत भरपूर प्रमाणावर वाढ होण्यासाठी

जमिनीत सेंद्रिय खत , शेणखत, बायो फर्टीलायझर, नँचरल अँमिनो अँसिडस,ह्युमिक अँसिडस,सीवीड, फलविक अँसिडस सारखे जैविक सेंद्रिय स्रोत वापरने आवश्यक आहे. तरच शेतीत संपन्नता दिसायला लागणार .

 

शेतकरी पुत्र विपुल चौधरी ९५८८४६२२७२

English Summary: If this is done then prosperity will be seen in agriculture, if the country is to survive then farmers will have to survive Published on: 05 April 2022, 05:23 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters