सध्या बऱ्याच दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये बऱ्याच प्रकारची अस्थिरता दिसून येत असून कधी भाववाढ होते तर कधी दर घसरत आहेत. कालचा जर आपण विचार केला तर सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती परंतु आज सोन्याचे दर काहीसे वाढले असून चांदीच्या दरात मात्र स्थिरता आहे.
जर आपण आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सोन्याच्या भावाचा विचार केला तर 22 कॅरेट साठी आजचा दर 47 हजार 250 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा साठी 51540 रुपये प्रति तोळा आहे. तर दहा ग्रॅम (एक भार)चांदीचा दर पाचशे चाळीस रुपये आहे.
नक्की वाचा:Gold Price: आजच खरेदी करा सोने आणि चांदी! 10 ग्रॅम सोने खरेदीमागे वाचतील 4795 रुपये
भारतातील आणि महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव( 24 कॅरेट साठी दहा ग्रॅमचे भाव)
1- मुंबई- 51 हजार पाचशे चाळीस रुपये
2- नागपूर- 51 हजार पाचशे सत्तर रुपये
3- पुणे- 51 हजार पाचशे सत्तर रुपये
4- दिल्ली- 51 हजार सहाशे नव्वद रुपये
5- कोलकाता- 51 हजार पाचशे चाळीस रुपये
6- हैदराबाद- 51 हजार पाचशे चाळीस रुपये
7- चेन्नई- 52 हजार 250 रुपये
सोन्याच्या बाबतीत हॉलमार्क आहे महत्त्वाचे
आपण जे काही सोने खरेदी करतो तेव्हा त्याची गुणवत्ता लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला हॉलमार्कचे चिन्ह खूप मदत करते.
त्यामुळे ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह बघितल्यानंतरच सोन्याची खरेदी करणे फायद्याचे ठरते. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड हे हॉलमार्क ठरवते व ही हॉलमार्किंग योजना ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड ऍक्ट, त्याचे नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
Share your comments