1. इतर बातम्या

LIC Policy: महिन्याला 794 रुपये भरा आणि मिळवा 5 लाख 25 हजार रुपये,एलआयसीची 'ही' पॉलिसी आहे फायदेशीर

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसी ही विमा क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य कंपनी असून कोट्यावधी भारतीयांचा विश्वास संपादन केलेली ही कंपनी आहे. या कंपनीने वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूक पर्याय गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. विविध आकर्षक योजना, या योजनांच्या माध्यमातून मिळणारा आकर्षक परतावा आणि विम्याचे कव्हर प्रत्येक प्लॅननुसार वेगळे आहे. या लेखामध्ये आपण एलआयसीच्या अशाच एका पॉलिसी बद्दल माहिती घेणार आहोत. जी एलआयसीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या पॉलिसीपैकी एक आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
jivan labh policy

jivan labh policy

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसी ही विमा क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य कंपनी असून कोट्यावधी भारतीयांचा विश्वास संपादन केलेली ही कंपनी आहे. या कंपनीने वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूक पर्याय गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. विविध आकर्षक योजना, या योजनांच्या माध्यमातून मिळणारा आकर्षक परतावा आणि विम्याचे कव्हर प्रत्येक प्लॅननुसार वेगळे आहे. या लेखामध्ये आपण एलआयसीच्या अशाच एका पॉलिसी बद्दल माहिती घेणार आहोत. जी एलआयसीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या पॉलिसीपैकी एक आहे.

जीवन लाभ पॉलिसी

 एलआयसीची महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना दोन प्रकारचे बेनिफिट दिले जातात. एक म्हणजे बोनसचा रुपात मिळणारा फायदा हा खूप महत्त्वाचा आहे. या पॉलिसीमध्ये पहिला बोनस हा पहिला पुनरावृत्ती बोनस म्हणून दिला जातो तर शेवटचा बोनस अतिरिक्त बोनस असतो. वेळेनुसार ग्राहकांना दोन्ही बोनसच्या फायदे दिले जातात.

या पॉलिसीमध्ये महिन्याला 794 रुपयांचा प्रिमियम भरून विमाधारकाला या पॉलिसीच्या परिपक्वता कालावधी पूर्ण होण्याअगोदरच 5 लाख 25 हजार रुपयांचा फायदा मिळतो आणि एवढेच नाही तर या कालावधीदरम्यान ग्राहकाला विमा संरक्षणाचे कवच देखील मिळते.

तुमच्या घरात  आठ वर्षाचे मुल असेल त्याला सुद्धा या योजनेत सहभागी होता येते. या योजनेत सहभागी होण्याची अधिकतम वयाची मर्यादा पन्नास वर्ष आहे. या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या पॉलिसीवर ग्राहकाला कर्ज देखील मिळते.

नक्की वाचा:Voter ID Card: अरे व्वा! 10 दिवसातचं अन घरबसल्या मिळणार मतदान कार्ड, 'या' लिंकवर जाऊन करा ऑनलाईन अर्ज

वैशिष्ट्ये

1- या पॉलिसीमध्ये कमीत कमी विमा रक्कम दोन लाख रुपयांची तर अधिकतम विमा रकमेची कोणतीही मर्यादा नाही. एक मर्यादित प्रीमियम पॉलिसी आहे.

2-ही एक मर्यादित प्रीमियम पॉलिसी असून ठराविक कालावधी पेक्षा कमी कालावधीसाठी रक्कम तुम्हाला भरावी लागते. जर तुम्ही पंधरा वर्षाचा प्लान निवडला तर दहा वर्ष, 21 वर्षाच्या पॉलिसी साठी पंधरा वर्ष  आणि पंचवीस वर्षाच्या पॉलिसीसाठी सोळा वर्ष तुम्हाला हप्ते भरावे लागतात. यामध्ये जर तुम्ही दर महिन्याला 794 रुपयांचा प्रीमियम  भरला तर वर्षाकाठी विमाधारकाला 9340 रुपयांचा हप्ता जमा करता येते.

नक्की वाचा:Post Office Scheme: पोस्टाच्या 'या'योजनेत करा एकदाच गुंतवणूक,मिळतील दरमहा पैसे

याचा अर्थ या योजनेचा पूर्ण कालावधीमध्ये घ एक लाख 49 हजार 45 रुपयांचा प्रीमियम भरावा लागणार आहे. जेव्हा या पॉलिसीला  पंचवीस वर्षे पूर्ण होतील तेव्हा कालावधी पूर्ण होतो.

परिपक्वतेवर लाभ

 या योजनेत गुंतवणूक केल्यावर विम्याचे दोन लाख रुपये मिळतात तसेच पुनरावृत्ती बोनसचा फायदा देखील मिळतो.

तसेच त्यापोटी दोन लाख 35 हजार रुपये आणि अतिरिक्त बोनसचे 90 हजार रुपये मिळतात. ही सगळी रक्कम एकत्र करून विचार केला तर एकूण परिपक्वता रक्कम 5 लाख 25 हजार रुपये मिळतात. याचा अर्थ  एक लाख 49 हजार 45 रुपये जमा करून पाच लाख 25 हजार रुपये मिळवता येतात.

नक्की वाचा:गुंतवणूक पर्याय! वार्षिक 1.5 लाखाची गुंतवणूक करेल भविष्यात तुम्हाला कोट्याधीश,कसे ते जाणून घ्या?

English Summary: this is lic policy is so benificial and give good return to investor Published on: 02 August 2022, 05:11 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters