बऱ्याच दिवसापासून काही बातम्या वाचायला आणि ऐकायला मिळाला कीइलेक्ट्रॉनिक स्कूटर मध्ये आग लागली.गेल्या महिन्याचा विचार केला तर सात पेक्षा जास्त घटना या भारतात घडले आहेत.
.या अनुषंगाने ई स्कूटरच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आणि ग्राहकांच्या मनात याबद्दल शंका उपस्थित होऊ लागले आहेत. या आग लागण्याच्या घटना ओकिनावा, ओला, बूम मोटर्स, जितेंद्र इलेक्ट्रिक आणि प्युअर कंपन्यांच्या स्कूटरमध्ये देखील घडले आहेत. या पार्श्वभूमीवर ओला आणि ओकिनावा सारख्या कंपन्यांनी त्यांच्या इ स्कूटर परत मागवले आहेत. ई स्कूटरच्या बॅटरी स्फोटामुळे आंध्र प्रदेशात 23 एप्रिल रोजी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. संबंधित घटनेची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी याबाबतीत ट्विटरच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली आहे. तसेच इलेक्ट्रिक व्हेईकल कंपन्यांना देखील कडक इशारा दिला आहे की ज्या डिफॉल्ट ईव्ही कंपन्या आहेत त्यांच्यावर दंड यासोबत मोठी कारवाई केली जाऊ शकते.
यावर ईव्ही कंपन्यांनी काय निर्णय घेतला?
या घटना घडल्या नंतर अनेक स्कुटर कंपन्यांनी त्यांचे अनेक मॉडेल्स परत मागवल्या आहेत. यात ओकिनावा कंपनीने 3125, ओला ईलेक्ट्रिक ने 1441, पिवर ईव्ही कंपनीने त्यांच्या ई ट्रान्स प्लस आणि ई प्ल्यूटो 7G मॉडेल्सचा 2000 स्कूटर परत मागवले आहेत
ई स्कूटरला आग लागण्याचे प्रमुख कारणे
या ज्या आग लागण्याच्या घटना घडल्या त्यामागील स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र अनेक रिपोर्टनुसार, या आगीचे प्रमुख कारण स्कूटर मधील बॅटरी आहे.
बहुतांशी इ स्कूटरला आग लागल्यानंतर त्यांच्या बॅटरीमधून निघणार्या धुरामुळे आग लागल्याचे समोर आले. तज्ञांकडून देखील या घटनांसाठी अगोदर बॅटरीला दोष देण्यात आला. कारण बॅटरी हा एकमेव भाग आहे जिथे आग निर्माण होऊ शकते. बरेच ग्राहक 40 किलोमीटर उन्हात गाडी चालवतात आणि परत आल्यावर लगेच बॅटरी चार्जिंग ला लावतात. त्यामुळे बॅटरी गरम असते अशावेळी बॅटरी चार्ज केल्याने बॅटरीचा स्फोट होण्याचीशक्यता असते. भारतामध्ये बरेच ठिकाणी तापमान 45 अंशांपर्यत आहे. अशा ठिकाणी थर्मल रणवे मुळे बॅटरी चे तापमान 90 ते 100 अंशापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो.
कारण परदेशातुन आयात केलेल्या या बॅटरी भारतातील हवामान लक्षात घेऊन डिझाईन न केल्यामुळे आगीसारख्या समस्या समोर येतात. हे टाळण्यासाठी भारतातील वातावरण लक्षात घेऊन या बॅटरी या देशात बनवायला हव्यात असं तज्ज्ञांचं मत आहे.
महत्वाच्या बातम्या
Share your comments