1. फलोत्पादन

या 4 सिताफळाच्या जाती देतील सिताफळ उत्पादकांना चांगले आर्थिक स्थैर्य अन आर्थिक नफा,नक्की वाचा महत्वपूर्ण माहिती

सिताफळाची लागवड भारताचा विचार केला तर महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम आणि आंध्र प्रदेश राज्यात जास्त होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this four veriety of custerd apple give more production and profit to farmer

this four veriety of custerd apple give more production and profit to farmer

सिताफळाची लागवड भारताचा विचार केला तर महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम आणि आंध्र प्रदेश राज्यात जास्त होते.

यामध्ये महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर बीड, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर आणि जळगाव, सातारा, नासिक आणि सोलापूर जिल्ह्यात जास्त प्रमाणात सीताफळाची लागवड होते. भारतामध्ये सीताफळाची लागवड प्रामुख्याने कमी पाणी असलेल्या म्हणजेच अवर्षणप्रवण भागात आणि हलक्‍या जमिनीत केली जाते. जर तुम्हाला नवीन सिताफळ लागवड करायची असेल या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सिताफळाच्या चार महत्त्वपूर्ण जातींविषयी माहिती देत आहोत. त्यामुळे लेख संपूर्ण वाचा.

 सीताफळाच्या चार महत्त्वपूर्ण जाती

सिताफळाच्या जाती त्यांचे वर्गीकरण हे त्यांचे ठिकाण,फळांचा आकार, रंग, त्यामध्ये असलेले बियांचे प्रमाण त्यानुसार केले जाते. अजूनही सिताफळाच्या चांगल्या जातींचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे.

1- बालानगर- ही जात झारखंड प्रदेशासाठी योग्य जात आहे. त्याची फळे हलक्या हिरव्या रंगाचे असतात. या जातीच्या भागांमध्ये बियांची संख्या जास्त प्रमाणात असते. या जातीचे एक झाड सुमारे पाच किलो फळे देते.

2- अर्का सहान- एक संकरीत जात असून या जातीची फळे तुलनेने गुळगुळीत आणि गोड असतात. अर्का सहान ही सिताफळाचे संकरित जात आहे. या जातीची फळे खूप रसाळ आणि खूप हळूहळू पिकणारी असतात. या जातीचे बियाणे प्रमानाणे कमी व आकाराने लहान असते. आतील गर बर्फासारख्या पांढरा दिसतो.

3- लाल सीताफळ- ही एक अशी  जात आहे ज्याची फळे लाल रंगाची असून प्रति झाड प्रति वर्ष सरासरी 40 ते 50 फळे येतात. या जातीची शुद्धता बियाणे उगवल्यानंतर बऱ्याच प्रमाणात टिकते.

4- मॅमथ- या जाती पासून बनणारे उत्पादन हे लाल सिताफळा पेक्षा जास्त मिळते. ही जात प्रतिझाड प्रतिवर्ष सुमारे 60 ते 80 फळे देते. लाल सिताफळाच्या तुलनेत या जातीच्या फळांमध्ये बियांची संख्या कमी असते. या जातीचे वाण उत्पादन व गुणवत्तेच्या दृष्टीने उत्तम असल्याचे आढळून येते. याशिवाय इतर काही प्रकारचे उत्पादन नाही वेगवेगळ्या ठिकाणी केले जाते.

तसेच वाशिंग्टन पीआय 107,005 ब्रिटिश गयाना आणि बार्बाडोस यासारख्या विविध जाती आहेत.

 महत्त्वाच्या जाती

नक्की वाचा:कृषी कृषीपंपासाठी केली वीज चोरी;सहा शेतकऱ्यांवर झाली दंडात्मक कारवाई

नक्की वाचा:Online Cow Dung Bussiness: गायीच्या शेना पासून बनणाऱ्या गोवऱ्या तुम्हाला बनवू शकतात लखपती

नक्की वाचा:अतिशय महत्वाची माहिती! गोबर गॅस प्लांट कसा उभारायचा? याबद्दल घ्या सविस्तर माहिती

English Summary: this four veriety of custerd apple give more production and profit to farmer Published on: 28 April 2022, 02:00 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters