1. कृषी व्यवसाय

गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मिती,होऊ शकते प्रदूषण समस्येवर मात्र

गोड ज्वारीच्या पिकापासून ज्वारी हे धान्य,गुरांसाठी चारा आणि त्याचबरोबर काही प्रमाणात इथेनॉल बनवण्याचा आपण भविष्यात विचार केला तर इंधनाच्या निर्मिती बरोबर अन्नसुरक्षा व चारा टंचाईचा प्रश्न सुटेल व प्रदूषणाच्या समस्या वर सुद्धा आपल्याला मात करता येईल. दिवसेंदिवस खनिज तेलाच्या किमती भारतातील नागरिकांना परवडणार नाहीत अशा पातळीवर पोहोचत आहेत.त्यामुळे जैवइंधनाच्या पर्याय शोधण्याची गरज आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
ethenol

ethenol

गोड ज्वारीच्या पिकापासून ज्वारी हे धान्य,गुरांसाठी चारा आणि त्याचबरोबर काही प्रमाणात इथेनॉल बनवण्याचा आपण भविष्यात विचार केला तर इंधनाच्या निर्मिती बरोबर अन्नसुरक्षा व चारा टंचाईचा प्रश्न सुटेल व प्रदूषणाच्या समस्या वर सुद्धा आपल्याला मात करता येईल.

दिवसेंदिवस खनिज तेलाच्या किमती भारतातील नागरिकांना परवडणार नाहीत अशा पातळीवर पोहोचत आहेत.त्यामुळे जैवइंधनाच्या पर्याय शोधण्याची गरज आहे.

 आपण जैवइंधनाच्या पुरेशा प्रमाणात आणि स्वस्त दरात पुरवठा करणारा पर्याय शोधण्यात यशस्वी ठरलो तर तसेच स्वस्तात उपलब्ध होणारे द्रव्य महागड्या पेट्रोलमध्ये मिसळून इंधनाची दरवाढ नियंत्रणात आणता येईल. तसेच खनिज तेलाची आयात करण्यासाठी जे परकीय चलन खर्च होते त्यात लक्षणीय प्रमाणात कपात होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ही चांगली उत्पन्न देणारा उत्पादक रोजगार मिळेल.अशा रीतीने समाजातील जवळपास सर्व घटकांसाठी फायदेशीर ठरणारे गोड ज्वारीपासून इथेनॉल तयार करणे हे होय.

 राज्यातील हवामान,उपलब्ध जमीन व पडणारा पाऊस लक्षात घेता गोड ज्वारी सारखे कमी पावसामध्ये आणि पावसाचा ताण सहन करणारे पीक आपल्याला घेता  येऊ शकते.

 पावसाचा अनियमितपणा तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे ऊसक्षेत्र कमी होत आहे.सततच्या वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे जागतिक स्तरावरील इंधन समस्या मुळे होणारे प्रदूषण, तसेच तेलसाठे वरती होणारा परिणाम लक्षात घेता उसाबरोबर इतर पिकांपासून तसेच गोड ज्वारी पासून इंधन मिळवणे जरुरीचे आहे. गोड ज्वारीचे बायोमास उत्पादनक्षमता उसापेक्षा अधिक आहे. त्यामुळे खरीप हंगामात गोड ज्वारीचे उत्पादन आपण घेऊ शकतो. केंद्र सरकारच्या नवीन धोरणाप्रमाणे पेट्रोल मध्ये आपण पाच ते दहा टक्के इथेनॉलचा वापर करू शकतो.त्यामुळे गोड ज्वारी सारखे पिक शाश्वत इंधनासाठी वापरण्यास वाव आहे..

 खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये गोड ज्वारीच्या ताटांचे उत्पादन40 ते 45 टन प्रति हेक्‍टर एवढे मिळते. या ताटा पासून चरक्याने रस काढला असता 12 ते 15 हजार लिटर रस प्रति हेक्‍टर मिळूशकतो.त्याला आंबवण्याची प्रक्रिया करून आपण इथेनॉल तयार करू शकतो.गोडज्वारीच्या रसामध्ये 10 ते 12 टक्के साखर असते. त्यामुळे ती आंबवण्याची प प्रक्रियेस योग्य असते. त्यामुळे त्यापासून साधारणतः सहा ते सात टक्के इथेनॉलची रिकवरी मिळते. म्हणजेच आपणास 1000 ते 1200 लिटर इथेनॉल उत्पादन प्रति हेक्‍टरी मिळू शकते.

सरकारी किमतीनुसार गोड ज्वारीपासून  चार महिन्यात 36 हजार ते 44 हजार रुपये प्रति हेक्‍टर उत्पादन मिळू शकते.

गोड ज्वारीपासून इथेनॉल बनवण्यासाठी महाराष्ट्रात सध्या तरी नव्याने भांडवली गुंतवणूक करण्याची गरज नाही. सध्या राज्यात बंद पडलेल्या साखर कारखान्यातील यंत्रसामग्रीचा वापर करून इथेनॉल निर्मिती करणे शक्य होऊ शकते. गोड ज्वारीच्या ताटातील रस काढून उरणारा चोथा हा गुरांसाठी दर्जेदार चारा म्हणून वापरता येईल. त्यामुळे राज्यातील चाऱ्याच्या टंचाईची समस्या निकालात निघेल आणि दुग्धोत्पादन व्यवसायाला चालना मिळेल. गोड ज्वारी चे दांडे साफ करण्याचे काम हे श्रमसघन असल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उत्पादक रोजगार निर्मिती होईल. सर्वसाधारणपणे साखर कारखाना वर्षातील जास्तीत जास्त सहा महिने चालू राहतात. त्याच्या ऐवजी हा गोड ज्वारीपासून इथेनॉल बनवण्याचा कारखाना वर्षातील किमान 270 दिवस सुरू राहू शकतो.

 

 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऊसा शिवाय दुसरे लाभदायक पिक नाही अशी काल पर्यंतचे स्थिती होती. आज ती उसाची शेती ही लाभदायक राहिलेली नाही. या समस्येवर एक रामबाण उपाय म्हणून आपण गोड ज्वारीच्या पिकाचा आणि त्यापासून इथेनॉल बनविण्याच्या उद्योगाचा विचार करायला हवा. या पिकांमध्ये आणि त्यापासून इथेनॉल बनविण्याच्या उद्योगांमध्ये राज्याच्या ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची क्षमता निश्चितपणे आहे. उद्योजकांनी गोड ज्वारी या पिकातील बीजरूप शक्ती विचारात घेऊन ती कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत.तसे केले तरच महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादक रोजगार निर्मिती होईल.

 डॉ. अनंत उत्तमराव इंगळे व श्री. शक्ती कुमार तायडे ( महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुल )

English Summary: ethenol making from sweet jwaar Published on: 30 August 2021, 06:06 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters