1. इतर बातम्या

सावधान! तुमचा होऊ शकतो आर्थिक तोटा, वेळीच घ्या दक्षता; वाचा आजचे राशीभविष्य

पुढचे दोन दिवस व्यावसायिकांना (business) काळजी घेण्याची गरज आहे. जमिनीशी (land) संबंधित काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाचा व्याप वाढू शकतो. बिझनेसमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी ज्येष्ठ व्यक्तींशी सल्ला घ्या.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
horoscope today

horoscope today

मेष

पुढचे दोन दिवस व्यावसायिकांना (business) काळजी घेण्याची गरज आहे. जमिनीशी (land) संबंधित काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाचा व्याप वाढू शकतो. बिझनेसमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी ज्येष्ठ व्यक्तींशी सल्ला घ्या. अन्यथा तोटा होण्याची शक्यता आहे. 

वृषभ

तुमच्या रूटीनमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा. एखादं नवं काम सुरू करण्यासाठी तुम्ही तुमची मानसिकता तयार कराल. आर्थिक कामांवर लक्ष केंद्रित केल्यावर मन शांत राहील आणि यश मिळेल. प्रिय व्यक्तींसोबत चांगला वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. 

मिथुन

आज संयम बाळगावा आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चिडणं टाळावं. तुम्ही ऑनलाइन बिझनेस (Online Business) करत असलात, तर बिझनेसच्या वाढीसाठी नवे प्लॅन्स करायला हवेत. रखडलेल्या प्लॅनवर पुन्हा काम सुरू करण्यासाठी आताचा काळ योग्य आहे. त्यातून तुम्हाला नफा होईल.

कर्क

पैशांशी संबंधित डील्स शहाणपणाने, विचारपूर्वक करा. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. कोणाहीसोबत वाद घालणं टाळा. वैवाहिक जीवनातले नातेसंबंध चांगले असतील. 

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची कमाल; 'रेड बनाना' केळीचा प्रयोग यशस्वी, मिळतोय उच्चांक दर

सिंह

पैसे मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतील. तुम्हाला आदर मिळेल. कामात येणारे अडथळे दूर होतील. शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवनात पार्टनरला साथ मिळेल. 

कन्या

कुटुंबाशी निगडित काम होईल. बोलताना इगोचं दर्शन घडवू नका. धार्मिक कार्यात रस वाढेल. प्रवासाचे योग येणार आहेत. त्यातून आर्थिक फायद्याची शक्यता आहे. 

तूळ

रखडलेलं काम पूर्ण होईल. पैसे मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि वाढवावे लागतील. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. लांब पल्ल्याचा प्रवास टाळा. कौटुंबिक जीवनात संघर्ष असेल. 

वृश्चिक

अचानक खर्च वाढतील. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडेल. खूप दूरवरून एखादी चांगली बातमी मिळेल. नातेवाईकांशी मतभेद होतील. आरोग्याबद्दल काळजी करण्याचं कारण असेल. प्रेमजीवनात नवा आनंद मिळेल. 

शेतकऱ्यांसाठी उद्योजक बनण्याची मोठी संधी; 35% अनुदानावर घरबसल्या सुरू करा 'हे' व्यवसाय

धनू

दीर्घ काळापासून असलेल्या मानसिक चिंता दूर होतील. पूर्ण उत्साहाने काम कराल. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय शहाणपणाने, विचारपूर्वक घ्या. तरच नफा मिळणं शक्य आहे, अन्यथा तोटा सोसावा लागेल. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. 

मकर

सोयीसुविधांवरचे खर्च वाढतील. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कर्जही घ्यावं लागू शकतं. अनोळखी व्यक्तींना भेटाल. अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून काही लाभ होतील. लव्ह रिलेशनशिप्सकडे (Love Relationships) खास लक्ष द्यावं लागेल. 

कुंभ

आर्थिक लाभाची मोठी क्षमता आहे. तुम्हाला मिळणारा आदर आणखी वाढेल. तुम्ही तुमच्या क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. रागामुळे तोटा होईल. कुटुंबासमवेत वेळ व्यतीत केल्यास मनःशांती मिळेल. 

मीन

करिअरमध्ये प्रगतीच्या संधी आहेत. तुमची कौशल्यं आणखी वृद्धिंगत करण्याची वेळ आली आहे. तुम्ही धार्मिक कार्यात रस घ्याल. आरोग्य उत्तम असेल. प्रियकर/प्रेयसीबद्दल मनात काही तरी शंका निर्माण होईल. 

महत्वाच्या बातम्या 
'या' शेतीची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरतेय फायदेशीर; 25 लाखांपर्यंत होतोय नफा
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 हजार गुंतवून मिळवा 16 लाख रुपयांचा लाभ
आनंदाची बातमी! 'या' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 900 कोटींचा लाभ

English Summary: suffer financial loss care time Read your horoscope today Published on: 08 September 2022, 05:41 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters