स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सगळ्यात मोठी बँक असून ग्राहकांच्या हितासाठी सदैव तत्पर असणारी ही बँक आहे. ग्राहकांच्या हितासाठी ही बँक कायमच वेगळ्या प्रकारच्या योजना आणत असते. एक महत्वपूर्ण योजना म्हणजे 'Wecare' ठेव योजना होय. यासंबंधी महत्वाची बातमी म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने या योजनेची मुदत मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी ठेवलेल्या मुदत ठेवीवर अर्थात फिक्स डिपॉझिट वर अधिक व्याज दिले जाते.
नक्की वाचा:व्हा स्मार्ट! ऑनलाइन पेमेंट करताना 'या' तीन गोष्टींचे करा पालन, वाचा फसवणुकीपासून
नेमकी काय आहे 'Wecare' केअर योजना?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी करिता असलेल्या मुदत ठेवींवर सामान्य एफडी मधून मिळणाऱ्या व्याजाच्या तुलनेत 0.80 टक्के अधिक व्याज मिळते.
आपण स्टेट बँकेचा मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाचा विचार केला तर ते जास्तीत जास्त 5.50 टक्के व्याज देत आहे. या योजनेच्या माध्यमातून पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी च्या फिक्स डिपॉझिट वर 0.80% व्याज मिळते. यामध्ये अतिरिक्त 0.30% समाविष्ट आहे.
जर आपण सध्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या फिक्स डिपॉझिट वर मिळणाऱ्या व्याजाचा विचार केला तर ते 5.50%व्याज मिळत आहे.
परंतु तुम्ही या योजनेमध्ये पाच वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.30% टक्के व्याज मिळेल. परंतु यामध्ये महत्वाचे म्हणजे तुम्ही जर या फिक्स डिपॉझिटच्या मुदतीपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळणार नाही.
सध्या स्टेट बँकेचे एफडीवर मिळणारे व्याजदर
जर आपण बँकेच्या फिक्स डिपॉझिट मिळणाऱ्या व्याजाचा विचार केला तर सध्या एसबीआय 2.90% ते 5.50% पर्यंत व्याज देत आहे व ज्येष्ठ नागरिकांना 3.40% ते 6.30% यास दिले जात आहे. एवढेच नाही तर स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या पाच ते दहा वर्षाच्या कालावधीसाठी ठेवीदारांना 5.50% पर्यंत व्याज देत आहे.
नक्की वाचा:तुम्हाला माहित आहे का? पीएम किसान लाभार्थ्यांना मिळतात 'हे' फायदे, वाचा सविस्तर
Share your comments