1. इतर बातम्या

व्हा स्मार्ट! ऑनलाइन पेमेंट करताना 'या' तीन गोष्टींचे करा पालन, वाचा फसवणुकीपासून

सध्या प्रत्येक जण ऑनलाइन पेमेंट करतात. या ऑनलाइन पेमेंट मुळे आता ट्रांजेक्शन खूप सोपे झाले आहे. परंतु याचा फायदा सायबर भामटे उचलत असून या माध्यमातून अनेक जणांची फसवणूक करण्यात येत आहे. परंतु ऑनलाइन पेमेंट करताना होणाऱ्या फसवणुकीपासून वाचायचे असेल तर काही छोट्या परंतु महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. त्याबद्दल या लेखात आपण माहिती घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
precaution tips in online payment

precaution tips in online payment

सध्या प्रत्येक जण ऑनलाइन पेमेंट करतात. या ऑनलाइन पेमेंट मुळे आता ट्रांजेक्शन खूप सोपे झाले आहे. परंतु याचा फायदा सायबर भामटे उचलत असून या माध्यमातून अनेक जणांची फसवणूक करण्यात येत आहे. परंतु ऑनलाइन पेमेंट करताना होणाऱ्या फसवणुकीपासून वाचायचे असेल  तर काही छोट्या परंतु महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. त्याबद्दल या लेखात आपण माहिती घेऊ.

नक्की वाचा:पेन्शनधारकांनो! तुमचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सबमिट करायचे असेल तर वापरा फेसआरडी अँप, वाचा माहिती

 ऑनलाइन पेमेंट करताना 'या' गोष्टींचे करा पालन

1- येणाऱ्या लिंकवर क्लिक करणे टाळा- आपल्याला माहित आहेच की अनेकदा आपल्या मोबाईलवर अनेक प्रकारच्या ऑनलाइन लिंक येतात. या लिंकच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवलेले असतात. परंतु अशी फसवणूक करणारे लोक या ऑनलाइन लिंकच्या माध्यमातून आपल्या डिवाइसमध्ये इंटर करतात व आपली सगळी डिटेल त्यांच्याकडे जाते.

त्यामुळे अशा कुठल्याही लिंक वर पूर्णपणे माहिती घेतल्याशिवाय क्लिक करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे तुमच्या मेल आयडीवर किंवा नंबर वर एखादी लिंक आली तर त्याच्यावर क्लिक करणे टाळा. व्हाट्सअपवर देखील अशा प्रकारच्या लिंक येतात त्यामुळे अशा लिंकला क्लिक करण्यापासून दूर रहा.

2- आपल्या मोबाइलची सुरक्षा महत्त्वाची- आपल्या डिव्हाईसची सुरक्षा नेहमी अपडेट ठेवणे गरजेचे आहे. त्यासोबतच लॉक ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. आपल्या मोबाईल मध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जसे की बँकिंग, फायनान्स पासून ते अनेक कागदपत्रे यामध्ये आपण ठेवतो.

परंतु हे करत असताना आपल्या डिवाइसचे अर्थात मोबाईलचे संरक्षण करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे महत्त्वाचे प्रत्येक ॲप लॉक करून ठेवणे गरजेचे आहे. तरी तुमचा फोन अनलॉक राहिला तरीही प्रत्येक ॲप लॉक ठेवणे हे एक महत्त्वाचे ठरू शकते.

3- तुमचा यूपीआय पीन शेअर नका करू- कधीही कितीही जवळच्या व्यक्तीला तुमचा यु पी आय पिन शेअर करू नका. जेवढा आपला एटीएम चा पिन महत्त्वाचा असतो तेवढाच युपीआय पिन देखील महत्त्वाचा असतो. आपल्याला माहित आहेच की या युपीआय पिनच्या द्वारेच आपण पेमेंट ॲप्स वर आपला व्यवहार अधिकृत करतो.त्यामुळे तुमची पिन सुरक्षित ठेवणे हे तुमचे पहिले कर्तव्य आहे.

नक्की वाचा:Legal Point: शेतात जाण्याचा रस्ता अडवला आहे का? तर 'ही' आहे कायदेशीर प्रक्रिया

English Summary: this is some important things that save you from online payment fruad Published on: 19 September 2022, 05:23 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters