1. सरकारी योजना

तरुणांसाठी योजना! केंद्र सरकारची'ही' स्पेशल योजना मदत करते बेरोजगार तरुणांना,वाचा या योजनेविषयी सविस्तर

केंद्र सरकारच्या समाजातील विविध घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार असो वा राज्य सरकार यांचा प्रयत्न असतो की संबंधित त्या त्या घटकाचे आर्थिक प्रगती व्हावी व एकंदरीत असलेली सामाजिक दरी भरून काढण्याचे काम देखील या योजनांच्या माध्यमातून केले जाते. आता बेरोजगारांचा प्रश्न किती गंभीर स्वरूप धारण करून आहे हे आपल्याला माहिती आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
scheme for youth

scheme for youth

केंद्र सरकारच्या समाजातील विविध घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार असो वा राज्य सरकार यांचा प्रयत्न असतो की संबंधित त्या त्या घटकाचे आर्थिक प्रगती व्हावी व एकंदरीत  असलेली सामाजिक दरी भरून काढण्याचे काम देखील या योजनांच्या माध्यमातून केले जाते. आता बेरोजगारांचा प्रश्न किती गंभीर स्वरूप धारण करून आहे हे आपल्याला माहिती आहे.

अशा तरुणांसाठी देखील त्यांना उद्योग व्यवसायात जम बसवता यावा यासाठी विविध प्रकारच्या योजना आहेत. अशीच एक महत्त्वपूर्ण योजना जी बेरोजगार तरुणांना फायदेशीर ठरते, या योजने विषयी या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा:अरे वा भारीच की राव…! पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार वार्षिक 36 हजार, वाचा सविस्तर

 पंतप्रधान रोजगार योजना

 ही योजना बेरोजगारांसाठी खूप महत्वपूर्ण असून या योजनेच्या माध्यमातून ज्या तरुणांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे अशा तरुणांना बँकांच्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज दिले जाणार आहे.

व्यवसाय करण्यासाठी जर तुमच्याकडे भांडवलाची कमतरता असेल तर तुम्ही प्रधानमंत्री योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. वास्तविक ही योजना सन 2020 मध्ये जाहीर करण्यात आली. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना 22.5 टक्के तर इतर मागास प्रवर्गाला  27 टक्के आरक्षण दिले जाते.

ही योजना संपूर्ण देशात लागू असून देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल बेरोजगार तरूण व ज्यांचे संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सर्व उत्पन्नाच्या स्त्रोतांच्या माध्यमातून 40 हजार रुपये आहे असे तरुण पीएमआरवाय 2021 अंतर्गत अर्ज करू शकता. एवढेच नाही तर संबंधित व्यवसायाचे दहा ते पंधरा दिवसांचे फ्री प्रशिक्षण देखील या तरुणांना दिले जाते. या योजनेत महिलावर्ग तसेच ओबीसी, अनुसूचित जाती आणि जमाती इत्यादींना आरक्षण देण्यात आले आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांना शेती यंत्रे खरेदी करण्यासाठी मिळणार 80 टक्यांपर्यंत अनुदान; असा घ्या लाभ

या योजनेसाठीच्या पात्रता

1- यामध्ये अर्जदाराचे वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 35 वर्ष असणे आवश्यक आहे.

2- अर्जदार हा कमीत कमी आठवी पास असणे गरजेचे आहे.

3- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 49 हजार पेक्षा जास्त नसावे.

4- लाभार्थीचे कायमस्वरूपी राहत असलेले निवास किमान तीन वर्षाचे असणे आवश्यक आहे.

3- सगळ्यात महत्वाचे म्हणजे लाभार्थी हा कोणत्याही प्रकारच्या राष्ट्रीयीकृत वित्तीय संस्था किंवा बँक, कोणत्याही सहकारी बँकेचे कर्ज थकबाकीदार अर्थात डिफॉल्टर असू नये.

4- सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी सुरू केलेल्या रोजगाराची किंवा व्यवसायाची एकूण किंमत दोन लाखापर्यंत असावी व जे तरूण त्यांच्या दुर्बल आर्थिक परिस्थितीमुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम नाहीत त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

 योजनेचा व्याजदर

 जर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून खर्च केला तर तुम्हाला 25000 कर्जावर बारा टक्के व्याज लागते व त्यासोबतच पंचवीस हजार रुपये ते एक लाखाच्या कर्जावर 15.5 टक्के व्याज द्यावे लागते. म्हणजे आपण एकंदरीत विचार केला तर कर्जाची रक्कम जर वाढली तर व्याजाचे दरही वाढतात.

नक्की वाचा:Important: 'ही' बँक देत आहे शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत, वाचा नेमकी काय आहे योजना?

English Summary: prime minister employment scheme is so benificial to youngster Published on: 22 September 2022, 10:38 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters