देशात सध्या दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याची झळ बसत आहे. असे असताना आता यामध्ये अजून वाढ झाली आहे. आता पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे तुम्ही नवीन LPG गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. यामुळे याचा देखील आर्थिक फटका तुम्हाला बसणार आहे. यापूर्वी सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी 1450 रुपये मोजावे लागत होते.
यामध्ये आता 750 रुपये अधिक म्हणजेच 2200 रुपये द्यावे लागतील. एक मोठी वाढ यामध्ये केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा बदल उद्यापासून लागू होणार आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, 5 किलोच्या सिलेंडरची सुरक्षा आता 800 ऐवजी 1150 करण्यात आली आहे.
तसेच उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनवर सिलिंडर दुप्पट केल्यास त्यांना दुसऱ्या सिलिंडरसाठी वाढीव सुरक्षा जमा करावी लागेल. मात्र, एखाद्याने नवीन कनेक्शन घेतल्यास त्याला पूर्वीप्रमाणेच सिलिंडरची सुरक्षा द्यावी लागणार आहे. आता विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत- रु-1065, सिलेंडरसाठी सुरक्षा रक्कम- रु. 2200, रेग्युलेटरसाठी सुरक्षा- रु.250, पासबुकसाठी -25 रुपये, पाईपसाठी--150 रु. अशी किंमत राहणार आहे.
Mansoon 2022: पंजाबरावांचा जून महिन्याचा मान्सून अंदाज जाहीर, शेतकऱ्यांना दिला महत्वाचा सल्ला
आता तुम्ही एका सिलिंडरसह नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी गेलात, तर त्यासाठी तुम्हाला 3690 रुपये मोजावे लागतील. यामुळे आता खिशाला झळ बसणार आहे. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजना' या नव्या दरांच्या अंमलबजावणीमुळे ग्राहकांनाही धक्का बसणार आहे. उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनवर सिलिंडर दुप्पट केल्यास त्यांना दुसऱ्या सिलिंडरसाठी वाढीव सुरक्षा जमा करावी लागेल.
महत्वाच्या बातम्या;
तरुणांनो नोकरीत पैसे मिळत नसतील तर सुरु करा अॅग्रीकल्चर स्टार्टअप, सरकार देणार २५ लाख रुपये
नेहेमी वाईटांशी चांगले आणि चांगल्यांशी वाईट का घडते? जाणून घ्या..
शेतकऱ्यांनो विजांपासून करा तुमचे संरक्षण, दामिनी अॅपमुळे वाचणार जीव
Share your comments