1. इतर बातम्या

SBI Gold Loan: तुम्हाला गोल्ड लोन घ्यायचे असेल तर एसबीआयचे लोन ठरेल फायदेशीर, प्रोसेसिंग फी वर पन्नास टक्के सूट

आपल्याला बऱ्याचदा पैशांची गरज पडते आणि प्रत्येक वेळी आपल्या हातात कॅश असतेच असे नाही. आर्थिक अडचणीच्या वेळी आपण बऱ्याच पर्यायांचा विचार करत असतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
sbi give more attractive gold loan offer for customers so take advantage

sbi give more attractive gold loan offer for customers so take advantage

आपल्याला बऱ्याचदा पैशांची गरज पडते आणि प्रत्येक वेळी आपल्या हातात कॅश असतेच असे नाही. आर्थिक अडचणीच्या वेळी आपण  बऱ्याच पर्यायांचा विचार करत असतो.

कधी नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेणे किंवा व्याजाने पैसे घेणे इत्यादी पर्याय आपण अवलंबतो. तर बऱ्याच जणांकडे घरात सोने असते. तर त्या सोन्यावर गोल्ड लोन घेण्याचा पर्याय देखील बरेच जण वापरतात. गोल्ड लोन साठी वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे नियम आहेत.

तसेच प्रोसेसिंग फी, यामध्ये देखील फरक असतो. त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणीच्या वेळी आपली आर्थिक गरज देखील भागली पाहिजे आणि घेतले जाणारे लोन आपल्याला परवडले पाहिजे अशा पर्यायांचा आपण विचार करतो. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया गोल्ड लोन साठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. या बद्दल या लेखात माहिती  घेऊ.

 एसबीआय ची खास ऑफर

 एसबीआय च्या ऑफर नुसार गोल्ड लोन च्या प्रोसेसिंग वर पन्नास टक्के सूट दिली जात असून एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळ नुसार, गोल्ड लोनच्या 0.25 टक्के रकमेवर प्रक्रिया शुल्क भरावे लागेल

याअंतर्गत तुम्हाला कमीत कमी वीस हजार ते जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. विशेष म्हणजे यावर सध्या एसबीआय 7.50 टक्के व्याज दराने गोल्ड लोन ऑफर करत आहे. या कर्जाचा कालावधी हा तीन वर्ष म्हणजे 36 महिन्यांचा राहणार असून जर तुम्ही आधी पेमेंट करू शकत असाल तरीही तुम्हाला यासाठी बुलेट रीपेमेंट गोल्ड लोन उत्पादनाची निवड करावी लागणार आहे.

या लोन साठी तुम्ही योनो ॲप्स आणि बँकेच्या शाखेत अर्ज करू शकता. आपल्याला माहित असेलच की गोल्ड लोन हा एक सेफ्टी लोनचा प्रकार असून यामध्ये तुमचा सिबिल स्कोर कसा आहे, याबद्दल कुठलाही फरक पडत नाही. हे लोन तुम्हाला अगदी पर्सनल लोन पेक्षा कमी व्याज दरात मिळते. जर तुम्हाला लोन घ्यायचे असेल तर तुम्ही एसबीआयच्या योनो ॲप्स वर अर्ज करू शकतात.

 यासंबंधी तुम्हाला पाळाव्या लागणाऱ्या गोष्टी

तुम्हाला तुमच्या दागिन्यांचे संपूर्ण माहिती द्यावी लागते. यामध्ये तुमच्या सोने किती कॅरेटचे आहे, सोन्याचा प्रकार कोणता आहे आणि वजन किती आहे त्यासोबतच तुमचा राहत्या घराचा पत्ता आणि तुम्ही कुठला व्यवसाय करतात इत्यादी बद्दल तपशीलवार माहिती द्यावी लागते.

तसेच तुम्ही महिन्याला किती कमावता याची दखल माहिती सादर करावी लागते व त्यानंतर अर्ज सादर करावा लागतो. सोबत तुम्हाला तुमचे दोन फोटो आणि केवायसी कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात.

डॉक्युमेंट बँकेत साइन इन करावे लागेल त्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Ghee Benifits: रोजाना टाका नाकात तूप, होतील 'हे' सहा अविश्वसनीय फायदे

नक्की वाचा:Alert: आधार कार्ड संबंधी केंद्राची नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, केंद्राचा यासंबंधी नागरिकांना 'हा' आहे इशारा

नक्की वाचा:या' जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींमध्ये बसणार पिझोमीटर, गावाची भूजल पातळीची नोंद समजेल अवघ्या 12 तासाला

English Summary: sbi give more attractive gold loan offer for customers so take advantage Published on: 29 May 2022, 09:43 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters