1. सरकारी योजना

Pm Kisan: पैसे 3 दिवसात येतील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात, जर तुम्हाला नाही मिळाले पैसे तर येथे करा तक्रार

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून आतापर्यंत राबवण्यात आलेल्या सगळ्या योजनांमध्ये यशस्वी ठरलेली योजनाआहे

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
if you not get pm kisaan scheme benifit can you complain on that number

if you not get pm kisaan scheme benifit can you complain on that number

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून आतापर्यंत राबवण्यात आलेल्या सगळ्या योजनांमध्ये यशस्वी ठरलेली योजनाआहे

आपल्याला माहित आहेच की, या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून  दहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

आता शेतकऱ्यांना अकराव्या हप्ता चे वेध लागलेले असताना 31 मे या दिवशी शेतकऱ्यांच्या  खात्यावर पैसे पाठविले जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी बऱ्याच नियमांमध्ये बदल केला असून जे अपात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना आता या अकराव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

यामध्ये शासनाने बरेच नियम बदलले असूनअसे अनेक लोक होते जे पात्र नसताना या योजनेचा लाभ घेत होते.परंतु आता अशा लोकांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात नोकरी करणारे नोकरदार, निवृत्तीवेतनधारक, डॉक्टर, वकील तसेच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनाआता या योजनेतून वगळण्यात आले आहे

तसेच लाभधारक यांसाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.या योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली असून 31 मे ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीपर्यंत जर एखाद्या शेतकऱ्याने ई-केवायसी केले नसेल तर त्यांना हा हप्ता मिळणार नाही.

त्यामुळे लवकरात लवकर ई केवायसी करून घेणे महत्त्वाचे आहे.परंतु काही कारणास्तवम्हणजेच आधार कार्ड वरील काही चुका,बँक खात्याविषयी चुकीची माहिती या व इतर काही कारणांमुळे तुम्हाला या हप्त्याचा  लाभ मिळाला नाही तर तुम्हाला याची तक्रार नोंदवता येणार आहे. शेतकरी बंधू खाली दिलेल्या नंबर वरकॉल करून तक्रार नोंदवू शकता.

 तुम्हाला अकरावा हप्त्याचे पैसे मिळाले नाही तर या ठिकाणी करा संपर्क

1- पी एम किसान टोल फ्री नंबर-18001155266

2- पी एम किसान हेल्पलाइन नंबर-155261

3- पी एम किसान लँडलाईन नंबर-011-23381092,23382401

4- पी एम किसान योजनेचे अपडेट केलेले हेल्पलाइन नंबर-011-24300606

5- पीएम किसान हेल्पलाइन-0120-6025109

6- ई-मेल आयडी -pmkisan-ict@gov.in

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Health News:टोमॅटो फ्लू केरळ ओडिशात धडकला, काय आहेत याची लक्षणे?

नक्की वाचा:श्रीलंकेनंतर अजून एक देश आर्थिक संकटात, अन्नधान्यही संपले, भारताकडे मदतीची मागणी

नक्की वाचा:काहीही निर्णय परंतु मरण होते शेतकऱ्यांचेच! नाफेडने हरभराची खरेदी केली बंद,शेतकऱ्यांचा होतोय 700 रुपये प्रतिक्विंटल तोटा

English Summary: if you not get pm kisaan scheme benifit can you complain on that number Published on: 28 May 2022, 12:16 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters