1. इतर बातम्या

Alert: आधार कार्ड संबंधी केंद्राची नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, केंद्राचा यासंबंधी नागरिकांना 'हा' आहे इशारा

आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र आहे. बँकेत, कुठलाही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी एकंदरीत सगळ्याच शासकीय कामांमध्ये आधार कार्ड अनिवार्य आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
central goverment give some important instruction about adhaar card

central goverment give some important instruction about adhaar card

आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र आहे. बँकेत, कुठलाही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी एकंदरीत सगळ्याच शासकीय कामांमध्ये आधार कार्ड अनिवार्य आहे.

बऱ्याच ठिकाणी आपण सहज रित्या आधार कार्डची छायांकित प्रत देतो.परंतु आता याबाबत केंद्र सरकारने नागरिकांना हे इशारा दिला असून त्यानुसारसरकारने म्हटले आहे की आधार कार्डची छायांकित प्रत कोणालाही देऊ नका कारण त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे.

छायांकित प्रत देणे ऐवजी तुम्ही तुमच्या आधारचा केवळ चा क्रमांक असलेली मास्कड कॉफीद्यावी अशा प्रकारचा सल्ला देखील सरकारने नागरिकांना दिला आहे.आधार कार्ड वापरासंदर्भात केंद्र सरकार या नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून त्यामध्ये कोणतीही व्यक्ती आता कोणत्याही संस्थेला आधार कार्डची छायांकित प्रत देण्यात येऊ नये असे सांगण्यात आले आहे. यामध्ये  इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाने नमूद केले आहे की हॉटेल्स किंवा चित्रपटगृहांना लोकांच्या आधार कार्डची प्रत घेण्याचा अधिकार नाही.

. अशा प्रसंगी लोकांनी आपल्या आधार कार्डचा गैरवापर होऊ नये याकरताआवश्यक त्या ठिकाणी म्हणजे एखाद्या व्यक्ती अथवा संस्थेला आधार कार्डची केवळ मास्कड कॉपी द्यावी. यामध्ये आधार नंबरचे केवळ चार क्रमांक नोंदवलेले असतात असे सांगण्यात आले  आहे.

यामध्ये ज्या संस्थांनी युआयडीएआय कडून आधार कार्डची घेण्याचा परवाना घेतलेला आहे अशा संस्थाच लोकांकडून आधार कार्डची प्रत मागू शकता. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण बऱ्याचदा आधार कार्ड डाऊनलोड करतो. अशावेळी आधार कार्ड डाऊनलोड करताना सायबर कॅफे चा उपयोग करू नये असा देखील सल्ला सरकारने दिला आहे.

तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सायबर कॅफेमध्ये सार्वजनिक संगणक वापरले तर त्यानंतर त्या संगणकावरून तुमच्या ई-आधार च्या सर्व डाऊनलोड केलेल्या प्रती कायमस्वरूपी हटवल्या आहेत की नाही याची खात्री करा असे देखील प्रसिद्धीपत्रकात म्हटले गेले आहे.

 महत्त्वाची माहिती

नक्की वाचा:Tvs Bike: मोबाईलच्या किंमतीत खरेदी करा टिव्हिएसची ही दमदार बाईक; जाणुन घ्या या ऑफरविषयी

नक्की वाचा:या' जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींमध्ये बसणार पिझोमीटर, गावाची भूजल पातळीची नोंद समजेल अवघ्या 12 तासाला

नक्की वाचा:Humni Control: 'या'साखर कारखान्याचा हुमणी नियंत्रणासाठी विशेष मास्टर प्लान, शेतकऱ्यांना प्रतिकिलो भुंगेरेमागे मिळतील 350 रुपये

English Summary: central goverment give some important instruction about adhaar card Published on: 29 May 2022, 03:03 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters