महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. मात्र परीक्षेच्या निकालामुळे एका बाप लेकाची जोडीची राज्यभरात चर्चा रंगली आहे. पुण्यातील एका 43 वर्षीय पुरुषाने आणि त्याच्या मुलाने दोघांनीही यावर्षी 10वीच्या महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दिली होती. या परीक्षेत वडील उत्तीर्ण झाले मात्र मुलगा नापास झाला. या निकालामुळे कुटुंबासाठी संमिश्र भावना निर्माण झाल्या आहेत.
43 वर्षीय भास्कर वाघमारे हे पुणे शहरातील बाबासाहेब आंबेडकर डायस प्लॉट येथील रहिवासी आहेत. यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी इयत्ता 7 वी नंतर शिक्षण सोडून नोकरीची वाट धरली होती. मात्र कालांतराने त्यांना पुन्हा एकदा अभ्यास सुरु करण्याची इच्छा निर्माण झाली. आणि शेवटी तब्बल 30 वर्षांनंतर ते आपल्या मुलासोबत यंदाच्या दहावीच्या परीक्षेला बसले.
“मला नेहमीच जास्त अभ्यास करायचा होता, पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आणि आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी कमाई करण्याच्या नादात पूर्वी हे करू शकलो नाही,” असे वाघमारे यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.
"मात्र शिक्षण कमी असल्यामुळे अधिक कमाई करता येत नव्हती. काही काळापासून, मी पुन्हा अभ्यास सुरू करण्यास उत्सुक होतो. जेणेकरून मला अधिक कमाई करण्यास मदत होईल. माझा मुलगाही या परीक्षेत बसला होता त्याच्यामुळे मला बरीच मदत झाली. मी कामानंतर परीक्षेची तयारी करत होतो. एकीकडे परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद जरी असला तरी मुलगा दोन पेपरमध्ये नापास झाल्याचं दु:ख आहे".
साहेब शेती परवडत नाही; पठ्ठ्याने 'फाईव्ह स्टार हॉटेल'साठी केली कोट्यावधींच्या कर्जाची मागणी
“मी माझ्या मुलाला पुरवणी परीक्षा देण्यास पाठिंबा देईन आणि मला आशा आहे की तो त्या परीक्षेत पास होईल. पुढे ते असेही म्हणाले, की माझ्याही मुलाच्या
संमिश्र भावना होत्या. “माझ्या वडिलांना जे करायचे होते ते केले याचा मला आनंद आहे. पण, मीही हार मानणार नाही. मी पुरवणी परीक्षेची तयारी करेन आणि पेपर साफ करण्याचा प्रयत्न करेन” अशी मुलानेदेखील भावना व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या:
मुसळधार पावसाचा हाहाकार; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; रस्त्यावरील गाड्याही गेल्या वाहून
अरे पावसा आता तरी पड! पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, पावसाअभावी बादलीने पिकाला पाणी देण्याची ओढवली वेळ
Share your comments