केंद्र सरकार सर्वसामान्य लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी (farmers) अनेक योजना राबवत असते. ज्यामधून गुंतवणूकदारांना चांगला आर्थिक लाभ मिळतो. आज आपण पोस्ट ऑफिसच्या सुविधांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामधून गुंतवणूकदारांना फायदा होईल.
जर तुम्ही पोस्ट ऑफिसचे गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला एफडीमधून अनेक सुविधा उपलब्ध होतील. यामध्ये तुम्हाला नफ्यासह सरकारी हमी मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला व्याजाची सुविधा तिमाही आधारावर मिळते.
पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) एफडी मिळवणे खूप सोपे आहे. इंडिया पोस्टने (india post) आपल्या वेबसाइटवर यासंबंधीची सर्व माहिती दिली आहे. या माहितीनुसार, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या 1,2, 3, 5 वर्षांसाठी एफडी (FD) मिळवू शकता.
रोपवाटिका अनुदानात वाढ! राज्य सरकारकडून मिळणार पावणे तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान
एफडीमधील फायदे
1) भारत सरकार तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करण्यासाठी हमी देते.
2) यामध्ये गुंतवणूकदारांचे (Investors) पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.
3) यामध्ये एफडी ऑफलाइन (रोख, चेक) किंवा ऑनलाइन (नेट बँकिंग / मोबाईल बँकिंग) द्वारे करता येते.
4) यामध्ये तुम्ही 1 पेक्षा जास्त FD करु शकता.
5) याशिवाय FD खाते संयुक्त असू शकते.
6) यामध्ये 5 वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) केल्याने तुम्हाला आयटीआर दाखल करताना कर सूट मिळेल.
7) एखाद्या पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये एफडी सहजपणे ट्रान्सफर करु शकतो.
दिलासादायक! सोयाबीन, कांद्याच्या भावात सुधारणा; जाणून घ्या बाजारभाव
अशी FD उघडा
पोस्ट ऑफिसमध्ये एफडी मिळवण्यासाठी तुम्ही चेक किंवा रोख रक्कम देऊन खाते उघडू शकता. यामध्ये, किमान 1000 रुपयांमध्ये खाते उघडता येते. त्याचबरोबर जास्तीत जास्त रक्कम जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
FD वर व्याज किती मिळते
या अंतर्गत 7 दिवस ते एक वर्षाच्या FD वर 5.50 टक्के व्याज (interest rates) मिळते. हाच व्याजदर 1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षांच्या FD वर देखील उपलब्ध आहे. त्याच वेळी, 3 वर्षांपर्यंतच्या FD वर 5.50 टक्के दराने व्याज देखील उपलब्ध आहे. 3 वर्षांच्या एका दिवसापासून 5 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.70 टक्के व्याज मिळते. म्हणजेच, इथे तुम्हाला FD वर चांगला नफा मिळेल.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फळबाग लागवडीसाठी सरकार देतंय 100 टक्के अनुदान
कान साफ करण्यासाठी इअरबड्स वापरताय? तर सावधान, पोहचू शकतो धोखा
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 'मागेल त्याला विहीर' योजनेअंतर्गत मिळणार 3 लाख 25 हजार रुपयांचे अनुदान
Share your comments