1. सरकारी योजना

रोपवाटिका अनुदानात वाढ! राज्य सरकारकडून मिळणार पावणे तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. आता पुन्हा एकदा राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. आता पुन्हा एकदा राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यात रोपवाटिका उभारणीसाठी शेतकऱ्यांना आता पावणे तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे रोपवाटिका उद्योगाला आधार मिळणार आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका" योजना यावर्षीही राबविली जाणार होती. मात्र अनुदान भरीव नसल्यामुळे योजनेला प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु आता "२०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षांमध्ये एक हजार नव्या रोपवाटिका उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याचा फायदा रोपवाटिका उद्योजकांना नक्की होईल. 

सरकारची मोठी घोषणा; साखरेसाठी प्रतिकिलो फक्त 20 रुपये मोजावे लागणार

यासाठी तब्बल २३ कोटी २३ लाख रुपये अनुदान वाटले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता प्रत्येक रोपवाटिकेला दोन लाख ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. रोपवाटिकांचे प्रस्ताव यापूर्वी मंजूर झाले असल्यास जुन्या निकषांप्रमाणे अनुदान मिळेल.

मात्र, २२ ऑगस्ट २०२२ पासून पूर्वसंमती दिलेल्या रोपवाटिकांना नव्या मापदंडानुसार जादा अनुदान द्यावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक उदय देशमुख यांनी राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. महत्वाचे म्हणजे ही योजना 'महाडीबीटी' प्रणालीवर पारदर्शक पद्धतीने राबविली जाणार आहे.

शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान तीन टप्प्यात मिळणार; जाणून घ्या वाटप प्रक्रिया

अनुदान असे मिळणार

1) घटक - फ्लॅट टाइप शेडनेटगृह, क्षेत्र - १००० चौ.मी, मापदंड- ४७५ रुपये प्रति चौ.मी, प्रकल्प खर्च - ४,७५,००० लाख रुपये, अनुदान - २,३७,५०० रुपये
२) घटक - प्लॅस्टिक टनेल, क्षेत्र - १००० चौ.मी, मापदंड - ६० रुपये प्रति चौ.मी, प्रकल्प खर्च - ६०,००० रुपये, अनुदान - ३०,००० रुपये
३) घटक - पॉवर नॅपसॅक स्प्रेअर, क्षेत्र - १ मापदंड - ७,६०० रुपये, प्रकल्प खर्च - ७,६०० रुपये, अनुदान - ७,८०० रुपये
४) घटक - प्लास्टिक क्रेटस्, प्रकल्प खर्च - १२,४०० रुपये, अनुदान ६,२०० रुपये

महत्वाच्या बातम्या 
'या' राशीच्या लोकांसाठी आजचा भाग्याचा दिवस; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
आनंदाची बातमी! तब्बल पावणेदोन लाख शेतकऱ्यांना मिळाली पीक विम्याची भरपाई
LIC ची 'ही' योजना खूपच खास; फक्त एकाच गुंतवणुकीवर मिळणार दरमहा 15 हजारांपर्यंत रक्कम

English Summary: Increase nursery subsidy up three lakh rupees received state government Published on: 17 October 2022, 09:45 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters