1. बातम्या

दिलासादायक! सोयाबीन, कांद्याच्या भावात सुधारणा; जाणून घ्या बाजारभाव

कांदा आणि सोयाबीन उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या याचे बाजारभाव वाढत असताना पाहायला मिळत आहेत. सोयबिनला महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र कांद्याची आवक थोड्या प्रमाणात कमी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

कांदा आणि सोयाबीन उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या याचे बाजारभाव वाढत असताना पाहायला मिळत आहेत. सोयाबिनला (soyabean) महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र कांद्याची आवक थोड्या प्रमाणात कमी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

या आठवड्यात कापूस, कपाशी, मका व टोमॅटो यांचे भाव (market price) घसरले आहेत. मात्र सोयाबीनचे भाव ३.२ टक्क्यांनी वाढले आहेत. यासह आपण कांद्याच्या किमती पाहिल्या तर कांद्याच्या किमती वाढून दोन हजार रूपयांवर गेल्या आहेत.

मका

या आठवड्यात मक्याच्या स्पॉट किमती २.३ टक्क्यांनी घसरून रु. २,३०६ वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स किमती २.५ टक्क्यांनी घसरून रु. २,३२० वर आल्या आहेत. जानेवारी फ्युचर्स किमती रु. २,४४५ वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत.

शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान तीन टप्प्यात मिळणार; जाणून घ्या वाटप प्रक्रिया

मूग

मुगाच्या किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात १.८ टक्क्यांनी वाढून रु. ७,००० वर आली आहे. यंदा मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ जाहीर झाला आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) सप्टेंबर महिन्यात उतरत होती. गेल्या सप्ताहात ती ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ५,०७८ वर आली होती. या सप्ताहात मात्र ती ३.२ टक्क्यांनी वाढून रु. ५,१८७ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव ( market price) रु. ४,३०० आहे.

LIC ची 'ही' योजना खूपच खास; फक्त एकाच गुंतवणुकीवर मिळणार दरमहा 15 हजारांपर्यंत रक्कम

तूर

आकोल्यामध्ये तुरीची स्पॉट किमत या आठवड्यात ती २.३ टक्क्यांनी वाढून रु. ७,३२९ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याच्या किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या. कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १६०८ होती. या सप्ताहात ती वाढून रु. २१५८ वर आली आहे.

महत्वाच्या बातम्या 
रोपवाटिका अनुदानात वाढ! राज्य सरकारकडून मिळणार पावणे तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान
'या' राशीच्या लोकांसाठी आजचा भाग्याचा दिवस; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
आनंदाची बातमी! तब्बल पावणेदोन लाख शेतकऱ्यांना मिळाली पीक विम्याची भरपाई

English Summary: Comforting Improvement soybean onion prices market price Published on: 17 October 2022, 10:36 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters