1. इतर बातम्या

Petrol Price Today: क्रूड ऑइलच्या किमतीत मोठी घसरण! पेट्रोल 84 तर डिझेल 79 रुपये

Petrol Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमतींमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून क्रूड ऑईलच्या किमती घसरताना दिसत आहेत. मात्र रशिया आणि युक्रेन युद्धापासून देशात महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
Petrol Diesel Price Today

Petrol Diesel Price Today

Petrol Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) कच्चा तेलाच्या किमतींमध्ये (Crude Oil) अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून क्रूड ऑईलच्या किमती घसरताना दिसत आहेत. मात्र रशिया आणि युक्रेन युद्धापासून देशात महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. पण त्याचा देशांतर्गत बाजारातील पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. तेलाच्या किमती त्याच पातळीवर कायम आहेत.

22 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील (Diesel) उत्पादन शुल्क (Excise duty) कमी केल्यानंतर हा बदल झाला. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र आणि मेघालयमध्येही तेलाच्या दरात बदल झाला आहे. तेल कंपन्यांनी 1 सप्टेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी केले होते.

एका अहवालात असे समोर आले आहे की, क्रूडच्या घसरणीमुळे तेल कंपन्या पेट्रोल आणि एलपीजीमधील खर्चाची भरपाई करण्याच्या स्थितीत पोहोचल्या आहेत. 22 मे रोजी साडेतीन महिन्यांहून अधिक काळ उत्पादन शुल्कात कपात करून केंद्राकडून मोठा दिलासा मिळाला होता. शुक्रवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $85.05 वर पोहोचली. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 90.85 वर दिसले.

महिंद्राच्या या दमदार इलेक्ट्रिक कारमध्ये आहेत धमाकेदार फीचर्स; सिंगल चार्जमध्ये धावेल ४५० किमी

शहर आणि किंमत

- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
-दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
-मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
-कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

सामान्य मधमाशीपेक्षा ३ पट अधिक मध देते ही मधमाशी; सरकारही देतंय 85 टक्के अनुदान

- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

यासारख्या इतर शहरांचे दर तपासा

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाणून घेण्यासाठी तेल कंपन्या एसएमएसद्वारे किंमत तपासण्याची सुविधा देतात. दर तपासण्यासाठी, इंडियन ऑइलच्या (IOC) ग्राहकाला RSP<deलर कोड> लिहून ९२२४९९२२४९ वर पाठवावा लागेल. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर एसएमएस करतात आणि BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर एसएमएस करतात.

महत्वाच्या बातम्या:
महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची मुसळधार बॅटिंग! अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
खुशखबर! केंद्र सरकार पीएम किसान योजने व्यतिरिक्त शेतकऱ्यांना देतंय ३६ हजार रुपये; अशी करा नोंदणी

English Summary: Petrol Price Today: Crude oil price has fallen! Petrol 84 and diesel 79 Rs Published on: 17 September 2022, 09:55 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters